अतिवृष्टीचा फटका! दसऱ्याला ग्राहकांच्या खिशाला कात्री, आज झेंडू, शेवंतीचे दर काय?

Last Updated:

Zendu Market : शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होत असून, आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारात झेंडूची जोरदार आवक सुरू झाली आहे.

Agriculture news
Agriculture news
पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होत असून, आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूची जोरदार आवक सुरू झाली आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या तीनही सणांमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विशेषतः झेंडूची मागणी दसऱ्याला उच्चांकी असते. त्यामुळे शेतकरीही या कालावधीत झेंडूची तोड करून विक्रीसाठी बाजारात पाठवतात.
यंदा पावसामुळे झेंडूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. फुलांच्या प्रतीवर परिणाम झाल्याने ओल्या झेंडूंचे प्रमाण सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी गुलटेकडी बाजारात ओल्या झेंडूला प्रति किलो 30 ते 40 रुपये दर मिळाला, तर चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला 100 ते 120 रुपये दर मिळाले. यामुळे शेतकऱ्यांना सुक्या झेंडूमध्ये चांगला फायदा होत आहे.
advertisement
पुणे, सोलापूर, धाराशीव, बीड आणि हिंगोली या भागातून झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दसऱ्यानिमित्त झेंडूचे दर नेहमीपेक्षा जास्त मिळतात, म्हणूनच अनेक शेतकरी फुले राखून ठेवतात आणि योग्य वेळीच बाजारात पाठवतात. मार्केट यार्डातील व्यापारी सांगतात की, गुरुवारपर्यंत फुलबाजाराचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. बुधवारी झेंडूची आवक आणखी वाढेल आणि दरातही चढ-उतार दिसू शकतात. किरकोळ बाजारात सध्या उत्तम प्रतीच्या झेंडूला 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
फक्त झेंडूच नव्हे तर गुलछडी आणि शेवंती या फुलांचीही बाजारात चांगली मागणी आहे. गुलछडीला घाऊक बाजारात 500 ते 700 रुपये दर मिळतोय, तर शेवंती 100 ते 250 रुपये दराने विकली जात आहे. मात्र, पावसामुळे अनेक फुलांची प्रतवारी घसरली असून, त्यामुळे चांगल्या प्रतीच्या फुलांना जास्त दर मिळत आहेत.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, यंदा पावसामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे ओल्या फुलांची संख्या जास्त असून, सुक्या फुलांना नेहमीपेक्षा दुप्पट दर मिळत आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आहे.
advertisement
घाऊक बाजारातील सध्याचे दर (प्रति किलो)
झेंडू (सुका) : 100 ते 120 रुपये
झेंडू (ओला) : 30 ते 40 रुपये
गुलछडी : 500 ते 700 रुपये
शेवंती : 100 ते 250 रुपये
एकंदरीत, पावसाच्या फटक्याने फुलांची प्रतवारी खालावली असली तरी सणांच्या उत्साहामुळे आणि मागणीमुळे चांगल्या प्रतीच्या झेंडू व इतर फुलांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोघांसाठीही हा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
अतिवृष्टीचा फटका! दसऱ्याला ग्राहकांच्या खिशाला कात्री, आज झेंडू, शेवंतीचे दर काय?
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement