12 वी नापास तरुण पारंपरिक शेतीला कंटाळला, एक निर्णय घेतला अन् कसं बदललं चित्र?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Mosambi Farming: मराठवाड्यातील अनेक शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील युवा शेतकरी मोसंबीच्या बागेतून लाखोंची कमाई करतोय.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात मराठवड्यातील शेतकरीही आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा आता फळबागांकडे आहे. या फळबागांच्या माध्यमातून शेतकरी चांगलं उत्पन्न घेतात. असाच एक प्रयोग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ताडपिंपळगाव येथील तरुण शेतकरी आश्विन काळे यांनी देखील केलेला आहे. 12 वी नापास असणाऱ्या काळे यांनी आपल्या शेतात मोसंबीची बाग लावली आणि यातून ते आता लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
अश्विन गोरख काळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधील ताडपिंपळगाव गावातील आहेत. अश्विन काळे हे बारावी नापास आहेत. अश्विन काळे यांचे आई वडील दोघाही शेती करायचे. अश्विन हे 2015 पासून शेतीच करत आहेत. त्यांच्याकडे एकूण साडे पाच एकर जमीन आहे. त्या साडे पाच एकर जमिनीपैकी त्यांनी अडीच एकरामध्ये मोसंबीच्या बागांची लागवड केलेली आहे. सुरुवातीला अश्विन हे पारंपारिक पिक घ्यायचे. पण त्यामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न आणि पाहिजे तसा नफा होत नव्हता. म्हणून त्यांनी मोसंबीची बाग लावण्याचा निर्णय घेतला.
advertisement
मोसंबीची सेंद्रिय शेती
अश्विन यांनी पहिल्यांदा 208 झाडांची मोसंबीची बाग लावली. ते अगदी पारंपारिक आणि ऑरगॅनिक पद्धतीने मोसंबीची काळजी घेतात. एका बहारामध्ये त्यांना एक ते सव्वा लाख रुपये एवढं उत्पन्न होतं. सगळा खर्च जाऊन हे उत्पन्न त्यांना मिळतं. आता त्यांच्या मोसंबीच्या बागांची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यामधून त्यांना दोन ते अडीच लाख रुपये एवढं उत्पन्न होईल, अशी आशा आहे. त्यासोबतच त्यांनी मोसंबीच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून कापसाची लागवड केली असून त्यातून देखील त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं आहे.
advertisement
कसं केलं व्यवस्थापन?
view commentsमोसंबीच्या बागेवरती ते ताक आणि गुळाची फवारणी करतात. त्यामुळे मधमाश्यांचा जास्त त्रास होत नाही. तसेच मोसंबीच्या वाढला आणि चवीलाही फरक पडतो. फळबागा आणि आंतरपीक यातून शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवू शकतो, असं अश्विन सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 11, 2024 3:01 PM IST

