Success Story : मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यानं करून दखवलं, पाळल्या 9 म्हशी, वर्षाला 8 लाखांचा नफा
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
भीमराव घाडगे यांनी मेहनतीच्या जोरावर एका पंढरपुरी म्हशीपासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती. टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवली असून आज त्यांच्याकडे नऊ पंढरपुरी म्हशी आहेत.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील भीमराव रामचंद्र घाडगे यांनी मेहनतीच्या जोरावर एका पंढरपुरी म्हशीपासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती. टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवली असून आज त्यांच्याकडे नऊ पंढरपुरी म्हशी आहेत. तर म्हशीपासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून वर्षाला सर्व खर्च वजा करून 7 ते 8 लाखांचा नफा घेत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे राहणारे भीमराव घाडगे यांची शेती सोलापूर पंढरपूर महामार्गावर आहे. शेती करत असताना शेतीला जोडधंदा तसेच दररोज घरच्या घरी वापरण्यासाठी दूध मिळावे या हेतूने घाडगे यांनी सुरुवातीला एक पंढरपुरी म्हैस भीमराव यांनी बाजारातून विकत आणली होती.
advertisement
त्या म्हशीपासून दररोज चार ते पाच लिटर दूध मिळत होते. दुधाला देखील चांगला दर मिळत असल्याने भीमराव यांनी हळूहळू करून पंढरपुरी म्हशी आणण्यास सुरुवात केली. आज भीमराव यांच्याकडे जवळपास नऊ म्हशी असून दूध विक्रीतून सर्व खर्च वजा करून ते वर्षाला 7 ते 8 लाख रुपयांची कमाई करत आहेत. तसेच या म्हशीपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर भीमराव हे शेतामध्ये खत म्हणून वापर करतात.
advertisement
पंढरपुरी म्हशीला दररोज खाण्यासाठी भीमराव हे ओला चारा, मका, कळबा दिवसातून दोन वेळा देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंढरपुरी म्हशी आजारी पडत नाहीत. तसेच पंढरपुरी म्हशीला चारा जरी खाण्यासाठी कमी पडला तरी देखील दूध मात्र चार ते पाच लिटरच मिळत असते. सध्या पंढरपूर म्हशीच्या दुधाला बाजारामध्ये 60 ते 70 रुपये लिटर दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेती करत करत शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केल्यास उत्तम फायदेशीर ठरेल, असा सल्ला भीमराव घाडगे यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यानं करून दखवलं, पाळल्या 9 म्हशी, वर्षाला 8 लाखांचा नफा









