खरिपाच्या तोंडावर खतांसंदर्भात कृषी विभागाचा मोठा निर्णय! वाचा सविस्तर

Last Updated:

Agriculture News : खरीप हंगाम तोंडावर असताना दरवर्षी शेतकऱ्यांना खतासाठी करावी लागणारी धावपळ यंदा टळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने ‘कृषिक’ नावाचे मोबाइल अॅप विकसित केले आहे.

News18
News18
मुंबई : खरीप हंगाम तोंडावर असताना दरवर्षी शेतकऱ्यांना खतासाठी करावी लागणारी धावपळ यंदा टळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने ‘कृषिक’ नावाचे मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या खतांचा साठा, प्रकार, विक्रेते व त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहिती मिळणार आहे, त्यामुळे खताच्या टंचाईचा बहाणा करत लूट करणाऱ्यांवर आळा बसणार आहे.
काळाबाजारावर रोक, पारदर्शक सेवा
शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात खते मिळावीत यासाठी कृषी विभागाने गंभीर पावले उचलली आहेत. ‘कृषिक’ अॅपमध्ये खत विक्रेत्यांची यादी, त्यांच्या दुकानातील उपलब्ध साठा, मोबाइल नंबर ही माहिती नियमित अद्यतनित केली जाणार आहे. त्यामुळे कोणताही विक्रेता जर खत असूनही देण्यास नकार देतो, तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
advertisement
हिंगोली जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू
सध्या या अॅपमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, वसमत आणि कळमनुरी तालुक्यांतील दुकानदारांची माहिती उपलब्ध आहे. औंढा नागनाथ तालुक्याची माहिती लवकरच समाविष्ट केली जाणार आहे.
या जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात 81 हजार 569 मेट्रिक टन खताचा वापर केला जातो. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी यांचा समावेश आहे. यंदा अंदाजे 3 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असल्यामुळे योग्य व पारदर्शक खतवाटप ही मोठी गरज ठरत आहे.
advertisement
‘कृषिक’ अॅपची वैशिष्ट्ये
खताचा प्रकार, साठा आणि उपलब्धतेची माहिती
पिकांनुसार खताचे प्रमाण आणि योग्य वापर पद्धती
बाजारभाव, सरकारी कृषी योजना आणि प्रशिक्षणांची माहिती
शेतकऱ्यांसाठी घरबसल्या सुलभ आणि पारदर्शक सेवा
अॅप कसे डाऊनलोड कराल?
Play Store वर जा आणि 'कृषिक' शोधा
अॅप डाऊनलोड करून आवश्यक परवानग्या द्या
‘चावडी’ या पर्यायावर क्लिक करा
‘खत उपलब्ध’ वर जाऊन आपला जिल्हा व तालुका निवडा
advertisement
विक्रेत्यांची यादी आणि साठा पाहता येणार
कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे खताच्या काळाबाजाराला लगाम लागणार असून, शेतकऱ्यांना वेळीच, योग्य दरात व पारदर्शक सेवा मिळणार आहे. हा डिजिटल पुढाकार शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरेल.अशी विभागाची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
खरिपाच्या तोंडावर खतांसंदर्भात कृषी विभागाचा मोठा निर्णय! वाचा सविस्तर
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde:  पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप
पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप
  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

View All
advertisement