Farmer Success Story: पाऊण एकरात केली गुलछडीची लागवड, कमी खर्चात शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न, कशी केली शेती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Farmer Success Story: नंदकुमार लोखंडे यांनी पाऊण एकरात दोन वर्षांपूर्वी गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखोंचं उत्पन्न झालं आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारे नंदकुमार लोखंडे यांनी पाऊण एकरात दोन वर्षांपूर्वी गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. या शेतीसाठी त्यांना 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. तर या एकदा लागवड केलेल्या गुलछडीच्या फुलाच्या शेतीतून शेतकरी नंदकुमार लोखंडे यांनी सर्व खर्च वजा करून 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी नंदकुमार लोखंडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पारंपरिक पद्धतीने पिक न घेता नंदकुमार लोखंडे यांनी पाऊण एकरात गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. एका फुटावर तीन बियाणे अशा पद्धतीने पाऊण एकरात नंदकुमार यांनी गुलछडीची लागवड केली आहे. गुलछडी या फुलाची लागवड केल्यावर जास्त फवारणीचा खर्च नसून फक्त पाणी जास्त द्यावे लागते.
advertisement
गुलछडी या फुलाची लागवड केल्यावर चार महिन्यांनंतर फुले येण्यास सुरुवात होते. एकदा लागवड केलेल्या गुलछडी पासून तीन वर्षे फुले मिळतात. तर या गुलछडी फुलाची जोडीने दररोज तोडून मुंबई येथील दादर फूल मार्केट येथे विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे. पाऊण एकरातून दररोज 30 किलोपर्यंत गुलछडी विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत.
advertisement
सध्या गुलछडीला बाजारात 40 रुपये किलोने दर मिळत आहे. सण-उत्सवाच्या काळात याच गुलछडीला 100 रुपये किलो दराने भाव मिळतो. गुलछडीची लागवड केल्याने खुरपणी खर्च वाचतो तसेच फवारणीचा देखील खर्च वाचतो. एकदा शेणखत घालून गुलछडीची लागवड केल्यावर उत्पन्न सुरू होते.
शेतकऱ्यांनी जर गुलछडी फुलाची लागवड केली तर त्यांचा औषध फवारणीवर होणारा खर्च आणि इतर खर्च वाचेल आणि उत्पन्न देखील भरघोस मिळेल असा सल्ला शेतकरी नंदकुमार लोखंडे यांनी दिला आहे. तर या एकदा लागवड केलेल्या गुलछडीतून पाऊण एकरातून लोखंडे यांनी आतापर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्न मिळवले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 10, 2025 9:59 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: पाऊण एकरात केली गुलछडीची लागवड, कमी खर्चात शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न, कशी केली शेती?