वडिलांनी मृत्यूपत्र न केल्यास मालमत्ता कोणाच्या नावावर होते? बहिणींना वाटा मिळतो का? नियम काय सांगतो?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Property News : अनेक कुटुंबांमध्ये वडील अथवा कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर मालमत्तेवरून वाद उद्भवत असल्याचे आपण पाहतो. विशेषतः वडिलांनी मृत्यूपत्र (Will) न करता मृत्यू झाल्यास, त्यांच्या मालमत्तेचे वितरण कसे होते? हेच आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : अनेक कुटुंबांमध्ये वडील अथवा कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर मालमत्तेवरून वाद उद्भवत असल्याचे आपण पाहतो. विशेषतः वडिलांनी मृत्यूपत्र (Will) न करता मृत्यू झाल्यास, त्यांच्या मालमत्तेचे वितरण कसे होते? त्यात मुलींचा म्हणजेच बहिणींचा हक्क किती आहे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे या बाबतीत कायदा काय सांगतो, याची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
वडिलांनी मृत्यूपत्र न केल्यास काय होते?
जर वडिलांनी मृत्यूपत्र करून ठेवले नसेल, तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती "वारस कायदा" (Law of Inheritance) यानुसार वाटली जाते. भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व पारशी समाजासाठी वेगवेगळे वारसा कायदे लागू आहेत. हिंदू कुटुंबासाठी हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 (Hindu Succession Act, 1956) लागू होतो, जो हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांना लागू आहे.
advertisement
हिंदू उत्तराधिकार कायद्याअंतर्गत वारस कोण?
जर वडिलांचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला, तर त्यांच्या नावे असलेली मालमत्ता प्रथम श्रेणीच्या वारसांमध्ये विभागली जाते. हे वारस म्हणजे जसे की, पत्नी, मुले, मुली, आई
यामध्ये मुली म्हणजेच बहिणींनाही समान वाटा मिळतो. म्हणजेच वडिलांच्या मालमत्तेवर बहिणींना त्यांच्या भावांइतकाच कायदेशीर वाटा आहे.
वाटप कसे केले जाते?
उदाहरणार्थ, जर वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी (बहीण) असे चार वारस असतील, तर वडिलांच्या मालमत्तेचे चार समान भाग केले जातील आणि प्रत्येक व्यक्तीला एक-एक भाग मिळेल. बहिणीला तिचा हक्काचा वाटा मिळतो,तो कोणीही नाकारू शकत नाही.
advertisement
बहिणीचा हक्क नाकारल्यास काय करावे?
जर भावांनी बहिणीला तिचा वाटा नाकारला, मालमत्तेवर एकहाती कब्जा घेतला,किंवा फसवणूक केली,तर बहिणीने कायदेशीर मार्ग अवलंबावा. सिव्हिल कोर्टात 'Partition Suit' दाखल करणे. मालमत्तेचा तुकडा मागण्याचा दावा करणे. महसूल विभागाकडे तक्रार करून 7/12 उताऱ्यावर नाव नोंदवण्याची मागणी करणे.
वडिलांनी जर जीवंत असताना मालमत्ता मुलाच्या किंवा इतर कोणाच्या नावावर हस्तांतर केली असेल, तर तो हक्क वादग्रस्त ठरू शकतो. जर कोणताही वारस वडिलांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांपर्यंत आपल्या हक्कासाठी अर्ज करत नसेल, तर इतर वारस संपूर्ण मालमत्तेवर हक्क सांगू शकतात. पण अशा परिस्थितीत कायद्याचा आधार घेत आपला हक्क पुन्हा मिळवता येतो. महिलांना 2005 पासून सुधारित कायद्यानुसार संपत्तीमध्ये पूर्ण आणि समान वाटा देण्यात येतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
वडिलांनी मृत्यूपत्र न केल्यास मालमत्ता कोणाच्या नावावर होते? बहिणींना वाटा मिळतो का? नियम काय सांगतो?