कांद्याचे दर उतरले, शेतकरी चिडलेले, नाफेडकडून लगोलग स्पष्टीकरण, बळीराजासाठी महत्त्वाची बातमी

Last Updated:

ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे.

कांदा दराबाबत नाफेडचं स्पष्टीकरण
कांदा दराबाबत नाफेडचं स्पष्टीकरण
मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. याबाबत नाफेडने स्पष्टीकरण दिले आहे.
ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे. या पेक्षा अधिक विक्री झालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील, असे सांगून नाफेड अशा प्रकारच्या खोट्या बातम्या आणि अफवांचा तीव्र निषेध करते आणि त्या पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आला आहे.
advertisement

नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा

केंद्र सरकारच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली ‘भारत’ आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
advertisement
परवडणाऱ्या किमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्नपदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘भारत’ ब्रँड उत्पादनांची विक्री केली जात आहे.
मराठी बातम्या/कृषी/
कांद्याचे दर उतरले, शेतकरी चिडलेले, नाफेडकडून लगोलग स्पष्टीकरण, बळीराजासाठी महत्त्वाची बातमी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement