Ration Card : मोठी बातमी! राज्यातील 30 टक्के कुटुंबांचे स्वस्त धान्य होणार बंद, नेमकं काय आहे कारण?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration Card eKYC : राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी, अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुंबई: राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी, अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत पुणे जिल्हा सर्वात मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात 70% ई-केवायसी पूर्ण, काही जिल्हे अद्याप मागे
गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने अंतिम मुदत वाढवूनही राज्यातील केवायसी प्रमाण 70% वरच थांबले आहे. ठाणे, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये चांगली प्रगती दिसून आली असली तरी पुणे जिल्ह्यात केवळ 54.42% ई-केवायसी पूर्ण झाली आहे, ज्यामुळे तो राज्यात सर्वात मागे आहे.
सर्वाधिक अपूर्ण ई-केवायसी असलेले जिल्हे
पुणे: 46.58%
advertisement
परभणी: 39.83%
बीड: 38.08%
नागपूर: 37.87%
नांदेड: 37.33%
धुळे: 36.89%
धाराशिव: 36.44%
जळगाव: 36.04%
नंदुरबार: 35.38%
लातूर: 35.04%
हिंगोली: 34.58%
सिंधुदुर्ग: 34.19%
ई-केवायसीसाठी अंतिम मुदत कोणती?
सुरुवातीला 1 नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने तीन ते चार वेळा मुदतवाढ दिली असून आता 15 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
रेशनकार्ड धारकांनी काय करावे?
शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर ई-केवायसी केली नाही, तर धान्य मिळणार नाही.
ई-केवायसी कशी करावी?
जर अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर जवळच्या स्वस्त धान्य दुकानात 4G ई-पॉस मशीनद्वारे ती पूर्ण करू शकता.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ई-केवायसी पूर्ण
राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 70% हून अधिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे
advertisement
ठाणे: 76.59%
भंडारा, वर्धा: 76.49%
गोंदिया: 73.19%
चंद्रपूर: 73.07%
नाशिक: 72.01%
छत्रपती संभाजीनगर: 71.48%
अन्यथा पुरवठा थांबवला जाईल
रत्नागिरी, वाशिम, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांतही 1 मार्चपर्यंत 70% पेक्षा जास्त ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर राज्यातील सर्व लाभार्थ्यांनी 15 मार्चपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचा धान्य पुरवठा थांबवला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 09, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Ration Card : मोठी बातमी! राज्यातील 30 टक्के कुटुंबांचे स्वस्त धान्य होणार बंद, नेमकं काय आहे कारण?