व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाबाला मागणी, मावळमधून 35 ते 40 लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डे जवळ येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डे जवळ येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन व्हॅलेंटाइन डे साठी सज्ज होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का? या तरुणाईच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जात आहेत. याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आदी मोठ्या शहरात ही फुले जातात.
advertisement
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होते. मावळातील गुलाब शेतीने येथील शेतकऱ्यांना मालामाल केलं असून दहा गुंठ्यांत सुरू केलेली शेती पन्नास एकरावर आली असून एकत्रित सायरोज कंपनी स्थापन करून वार्षिक गुलाब शेतीतून कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने यावर्षी व्हॅलेंटाइन डे ला मावळातून 35 ते 40 लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार असून, स्थानिक बाजारपेठेत 55 ते 60 लाख गुलाबांची निर्यात होणार आहे. प्रेम भावना व्यक्त करणारा व्हॅलेंटाइन डे 14 फेब्रुवारीला आहे. या दिवशी देश विदेशातून गुलाबाला मोठी मागणी असते. यामुळे व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर मावळातील फुल उत्पादक शेतकरी हे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फुलांच्या झाडांची कटिंग व बेंडिंगला प्रारंभ करून चांगले उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यांपासून दिवस-रात्र शेतात राबत आहेत.
advertisement
यावर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला 3 फेब्रुवारीला सुरुवात झाली. यावर्षी पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनाबरोबर दर्जाही उत्तम आहे. मात्र थंडी कमी असल्यामुळे उत्पादनात घट पाहायला मिळत आहे. पोषक वातावरणामुळे औषधांवर होणारा नाहक होणारा खर्च कमी झाला असून, उत्पादन, दर्जा आणि मागणीमुळे फुल उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह फुल उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे. मावळातील फुलांना मागणी घटली असून, प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला 14 ते 16 रुपये तर स्थानिक बाजारपेठेत भाव कमी जास्त होत राहत आहे. मागील वर्षीपेक्षा या वर्षी फुलाचे 1 ते 2 रुपयांनी दर कमी झाले आहे.
advertisement
व्हॅलेंटाइन डे ला मावळातील डच फ्लॉवर प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉईजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफिकल अमेझॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अव्हिलॉंस, या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इंग्लंड, जपान, दुबई व इथोपिया या देशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकाता, भोपाळ, इंदूर, सुरत, हैदराबाद व गोवा या स्थानिक बाजारपेठेत सर्वाधिक मोठी मागणी असते, अशी माहिती व्यवसायिक मुकुंद ठाकर यांनी दिली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
February 10, 2025 5:07 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाबाला मागणी, मावळमधून 35 ते 40 लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार

