Agriculture News: शेतकऱ्याची भरपाई की चेष्टा? खात्यात किती पैसे आले? विमा कंपनीचा मेसेज व्हायरल

Last Updated:

Pik Vima : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

agriculture news
agriculture news
मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यातच पालघरमधील वाडा तालुक्यातील शिलोत्तर गावातील शेतकरी मधुकर पाटील यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फक्त २ रुपये ३० पैसे जमा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे प्रशासनावर तीव्र टीका होत असून, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पूरामुळे उध्वस्त झाले जीवन
मधुकर पाटील हे साधारण शेतकरी असून त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील संपूर्ण भात आणि भाजीपाला पिके वाहून गेली. घराच्या परिसरात पाणी साचल्यामुळे पिकाबरोबरच जनावरांसाठीच्या चाऱ्याचेही नुकसान झाले. पाटील यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगी आणि ११वीत शिकणारा मुलगा आहे. त्यामुळे उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, याची चिंता त्यांना सतावत आहे.
advertisement
केंद्र सरकारवर टीका
पाटील यांनी सरकारच्या योजनांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “प्रधानमंत्री पीक विमा योजना नरेंद्र मोदी यांच्या नावाने आहे. या योजनेतून थोडाफार दिलासा मिळेल, अशी आशा होती. पण माझ्या खात्यात फक्त २ रुपये ३० पैसे जमा झाले. एवढ्या मोठ्या आपत्तीनंतर ही मदत म्हणजे थट्टा आहे.
शेतकऱ्यांचा वाढता रोष
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अशीच परिस्थिती भोगावी लागत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. काहींना केवळ काही रुपये ते काही दशांश पैशांचे विमा हप्ते जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News: शेतकऱ्याची भरपाई की चेष्टा? खात्यात किती पैसे आले? विमा कंपनीचा मेसेज व्हायरल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement