Kanda Chal Yojana : कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकार देतय अनुदान; पात्रता,आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानीकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांद्याचे सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याच्या दर्जावर व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. तर दुसरीकडे शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. याच अनुषंगाने राज्य सरकारने शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदाचाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानीकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांद्याचे सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याच्या दर्जावर व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. तर दुसरीकडे शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. याच अनुषंगाने राज्य सरकारने शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदाचाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासाठी अनुदान देखील राज्य सरकार देत आहे. मग आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
अनुदान देण्याचे स्वरूप कसे आहे?
5,10, 15, 20 व 25 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रुपये 3500/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अनुदान देते . एका लाभार्थ्याला 25 मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.
advertisement
पात्रता काय आहे?
1) शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. 7/12 वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
2) शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
3) सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
advertisement
ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
7/12 उतारा
8 अ
आधार कार्डाची छायांकित प्रत
आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र.
अर्ज कसा कराल?
view commentsसदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 06, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Kanda Chal Yojana : कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकार देतय अनुदान; पात्रता,आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या माहिती


