कोरडवाहू जमिनीत सोनं पिकवलं, शेजाऱ्यांकडून पाणी घेतलं, शेतकऱ्याने 3 लाख कमवून दाखवले!

Last Updated:

विष्णू राठोड तीन वर्षांपासून नियमितपणे हरभऱ्याची लागवड करत आहेत. विष्णू राठोड यांचा अनुभव दाखवतो की चांगले नियोजन आणि मेहनत करून कमी शेतीतूनही अधिक उत्पन्न मिळवता येते.

+
हरभऱ्याचे

हरभऱ्याचे पीक बीडचा युवक आर्थिक प्रगतीकडे

प्रशांत पवार, प्रतिनिधी 
बीड : सध्याच्या घडीला शेतकरी हे शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. बीड जिल्ह्यातील विष्णू राठोड यांची शेतकरी वर्गात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याचा धाडसी प्रयत्न केला. विष्णू राठोड यांचा जीवन प्रवास अगदी संघर्षमय आहे. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध केली. नोकरी लागल्यानंतर नोकरीच्या कामात त्यांना अपेक्षित परवड आणि समाधान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीला सोडलं आणि शेतीत काम करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
विष्णू यांची शेती कोरडवाहू होती. विष्णू यांनी कधीही हार मानली नाही. त्यानी शेतीत वेगळं काहीतरी करायचं ठरवलं आणि रब्बी हंगामात हरभऱ्याच्या शेतीतून आपला मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विष्णू राठोड यांनी 40-45 हजार रुपये खर्च करून बोर घेतला. पण पाण्याची योग्य सोय झाली नाही कारण बोरला पाणी लागलं नाही. तरीदेखील त्यांनी प्रयत्न न थांबवता चुलत भावाकडे पाण्यासाठी हाथ पसरवत आपल्या दीड एकरमध्ये रब्बीचे पीक घेण्यासाठी पाण्याची मागणी केली.
advertisement
सुरुवातीला विष्णू राठोड यांनी अर्धा एकर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड केली. पहिल्या वर्षीच त्यांना चांगला नफा मिळाला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुन्हा दीड एकर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड केली. रब्बीच्या हंगामामध्ये हरभऱ्याचे उत्पादन चांगले मिळाले आणि त्यातून त्यांनी अधिक उत्पन्न मिळवले. सध्या विष्णू राठोड तीन वर्षांपासून नियमितपणे हरभऱ्याची लागवड करत आहेत.
advertisement
विष्णू राठोड यांचा अनुभव दाखवतो की चांगले नियोजन आणि मेहनत करून कमी शेतीतूनही अधिक उत्पन्न मिळवता येते. त्यांनी आपल्या प्रयत्नांतून दाखवले की शेतीतील पारंपरिक पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. विष्णू राठोड यांचे हरभऱ्याच्या शेतीचे यश म्हणजे त्यांची सततच्या कामाची मेहनत आणि नवीन काहीतरी शिकण्याची ओढ आहे. त्यांच्या या प्रयत्नाने अनेक युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
advertisement
विष्णू राठोड यांना हरभऱ्याच्या पिकातून प्रत्येक हंगामात किमान 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळते. विष्णू राठोड यांची शेती करण्याची पद्धत इतर शेतकऱ्यांनीही आवर्जून आपल्या शेतीसाठी याचा फायदा घेतला पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कोरडवाहू जमिनीत सोनं पिकवलं, शेजाऱ्यांकडून पाणी घेतलं, शेतकऱ्याने 3 लाख कमवून दाखवले!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement