ट्रॅक्टर सर्विसिंगचा निष्काळजीपणा पडेल महागात! शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाच

Last Updated:

Tractor News : आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर हे केवळ यंत्र न राहता शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनले आहे. नांगरणी, पेरणी, फवारणी, मालवाहतूक ते कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची ठरते.

Tractor News
Tractor News
मुंबई : आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर हे केवळ यंत्रराहता शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनले आहे. नांगरणी, पेरणी, फवारणी, मालवाहतूक ते कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र, सततच्या वापरामुळे ट्रॅक्टरमध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढते. हंगामाच्या मध्यात ट्रॅक्टर बंद पडल्यास शेतकऱ्यांचे काम खोळंबते, खर्च वाढतो आणि वेळेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ट्रॅक्टरची नियमित सर्व्हिसिंग व देखभाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
अनेक शेतकरी ट्रॅक्टर पूर्णपणे बिघडेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही सवय भविष्यात मोठ्या खर्चाला कारणीभूत ठरू शकते. नियमित सर्व्हिसिंगमुळे लहान बिघाड वेळीच लक्षात येतात आणि मोठ्या दुरुस्तीचा खर्च टाळता येतो. योग्य देखभाल केल्यास ट्रॅक्टरची कार्यक्षमता कायम राहते, इंधन बचत होते आणि यंत्राचे आयुष्यही वाढते.
advertisement
ट्रॅक्टर सर्व्हिसिंगसाठी योग्य
ट्रॅक्टर सर्व्हिसिंगसाठी योग्य वेळ ओळखणे महत्त्वाचे आहे. नवीन ट्रॅक्टर घेतल्यानंतर पहिली सर्व्हिस साधारण ५० ते १०० तासांच्या वापरानंतर करणे आवश्यक असते. त्यानंतर प्रत्येक २५० ते ३०० तासांनी नियमित सर्व्हिसिंग करणे फायदेशीर ठरते. विशेषतः शेतीचा हंगाम संपल्यानंतर ट्रॅक्टरची सखोल तपासणी केल्यास पुढील हंगामात अडचणी येत नाहीत.
advertisement
पहिली सर्व्हिसिंग अत्यंत महत्त्वाची
पहिली सर्व्हिसिंग अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या टप्प्यावर इंजिनचे घटक एकमेकांशी नीट जुळवले जातात. इंजिन ऑइल बदलणे, ऑइल व एअर फिल्टर स्वच्छ करणे, नट-बोल्ट घट्ट आहेत का याची खात्री करणे गरजेचे असते. पहिल्या सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात इंजिनच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
इंजिन ऑइल आणि फिल्टरची भूमिका महत्वाची
इंजिन ऑइल आणि फिल्टरची भूमिका फार महत्त्वाची आहे. इंजिनमध्ये योग्य प्रमाणात स्वच्छ ऑइल नसल्यास घर्षण वाढते आणि इंजिन लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे वेळेवर ऑइल बदलणे व फिल्टर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कूलिंग सिस्टीमकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. रेडिएटरमध्ये पुरेसे कूलंट असावे, धूळ व कचरा साचू नये आणि फॅन बेल्टची स्थिती नियमित तपासली पाहिजे.
advertisement
ट्रॅक्टरची हायड्रॉलिक सिस्टीम
ट्रॅक्टरची हायड्रॉलिक सिस्टीम शेतीच्या अवजारांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. हायड्रॉलिक तेलाची पातळी कमी झाल्यास किंवा पाईपमध्ये गळती असल्यास कामात अडथळे येतात. त्यामुळे सर्व्हिसिंगदरम्यान हायड्रॉलिक सिस्टीमची तपासणी आवश्यक आहे. यासोबतच ब्रेक आणि क्लचची स्थिती तपासणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. खराब ब्रेक किंवा झिजलेला क्लच अपघाताचा धोका वाढवू शकतो.
advertisement
ट्रॅक्टरच्या  टायर्सची काळजी
ट्रॅक्टरचे टायर आणि त्यातील हवेचा दाब योग्य असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चुकीचा दाब असल्यास टायर लवकर खराब होतात आणि इंधन वापर वाढतो. बॅटरीइलेक्ट्रिकल सिस्टीमची तपासणी केल्यास स्टार्टिंगची समस्या टाळता येते. इंधन सिस्टीम स्वच्छ ठेवणे आणि एक्झॉस्टमधून येणाऱ्या धुराच्या रंगाकडे लक्ष देणेही आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
ट्रॅक्टर सर्विसिंगचा निष्काळजीपणा पडेल महागात! शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाच
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement