2 ऑगस्टला PM Kisan चा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? लगेच पाहा लाभार्थी यादी
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan 20th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने अधिकृत घोषणा करत स्पष्ट केले आहे की, 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता देशभरातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 20 वा हप्ता जमा केला जाणार आहे.
पाच महिन्यांनंतर मिळणार पैसा
फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता वितरित केल्यानंतर तब्बल पाच महिन्यांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली. दरम्यान, सोशल मीडियावर आणि विविध पोर्टल्सवर संभाव्य तारखांबाबत अफवा आणि चर्चांचा भडीमार सुरू होता. मात्र, कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली होती. आता कृषी मंत्रालयाने अधिकृत माहिती देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
advertisement
लाभार्थी यादीत नाव आहे का?
शेतकऱ्यांनी खालील स्टेप्स वापरून आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासावे.सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.होमपेजवर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका आणि ‘Get Data’ वर क्लिक करा.
यादीत नाव दिसल्यास हप्ता मिळण्याची खात्री होते. नाव न आल्यास, स्थानिक कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क करा.
advertisement
ऑनलाइन तक्रार कशी करायची?
जर कोणत्याही कारणाने 19 वा किंवा 20 वा हप्ता खात्यात आला नसेल, तर तुम्ही पीएम किसान पोर्टलवरून तक्रार करू शकता. यासाठी https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
‘किसान कॉर्नर’ या विभागात ‘तक्रार नोंदवा (Register Grievance)’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचे सर्व तपशील भरा आणि तक्रार सबमिट करा. तक्रारीची स्थिती ‘Complaint Status’ या पर्यायातूनही तपासता येते. ऑनलाइन तक्रारीशिवाय, शेतकरी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर 155261 किंवा 1800-115-526 फोन करून तक्रार दाखल करू शकतात. तसेच, स्थानिक कृषी अधिकारी किंवा CSC केंद्राच्या सहाय्याने देखील समस्या नोंदवता येते.
advertisement
दरम्यान, 20 वा हप्ता येण्याआधी शेतकऱ्यांनी आपले खाते आधारशी लिंक केले आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? आणि e-KYC पूर्ण झाले आहे का? याची खातरजमा करावी. या अटी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता दिला जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 2:41 PM IST