महिंद्रा ५७५ डीआय
महिंद्रा कंपनीचा हा ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. २७३० सीसीचे इंजिन १९०० आरपीएम निर्माण करते, ज्यामुळे तो उत्कृष्ट मायलेज आणि दमदार परफॉर्मन्स देतो. यात ऑइल-बाथ एअर फिल्टर आहे, ज्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते. १६०० किलोपर्यंत वजन उचलण्याची क्षमता, ४७.५ लिटरची इंधन टाकी आणि पर्यायी ड्राय डिस्क किंवा ऑइल-इमर्स्ड ब्रेक प्रणाली यामुळे हा ट्रॅक्टर टिकाऊ आणि कार्यक्षम ठरतो. किंमत ६.८० लाख ते ७.१० लाखांपर्यंत असून २ वर्षांची वॉरंटी दिली जाते.
advertisement
स्वराज ७३५ एफई
४० एचपी क्षमतेचा स्वराज ७३५ एफई हा मध्यम आकाराच्या शेतीसाठी उत्तम ट्रॅक्टर आहे. २७३४ सीसी इंजिन आणि ३२.६ एचपी पीटीओ पॉवरमुळे तो विविध कृषी अवजारांसह सहज चालतो. या ट्रॅक्टरमध्ये वॉटर-कूल्ड सिस्टम आहे, जी जास्त तापमान टाळते. पॉवर स्टीअरिंग, ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गिअर्स, मोबाइल चार्जर, पार्किंग ब्रेक यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. हा मॉडेल ५.८५ लाख ते ६.२० लाखांच्या दरम्यान उपलब्ध आहे.
महिंद्रा २६५ डीआय
महिंद्राचा हा ३० एचपी ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी परवडणारा आणि कार्यक्षम पर्याय आहे. ३ सिलेंडर, २०४८ सीसीचे इंजिन आणि १९०० आरपीएम क्षमतेमुळे तो रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि हलक्या अवजारांसाठी योग्य ठरतो. १२०० किलो उचलण्याची क्षमता आणि गुळगुळीत गियरशिफ्ट यामुळे तो चालवायला सोपा आहे. ४.९५ लाख ते ५.१० लाख किंमतीत मिळणारा हा ट्रॅक्टर २ वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध आहे.
स्वराज ७४४ एफई
हा ४८ एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर मोठ्या शेतांसाठी उपयुक्त आहे. ३ सिलेंडर इंजिन, ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गिअर्स, तसेच ऑइल-इमर्स्ड ब्रेक पर्याय यामुळे तो शक्तिशाली आणि सुरक्षित आहे. हा मॉडेल १२ व्ही ८८ एएच बॅटरीसह येतो, ज्यामुळे सुरळीत स्टार्टिंग होते. टिकाऊपणा आणि पॉवरच्या दृष्टीने हा स्वराजचा सर्वाधिक मागणी असलेला ट्रॅक्टर आहे.
पॉवरट्रॅक ४३९ डीएस सुपर
या ४१ एचपी ट्रॅक्टरमध्ये ३९ एचपी पीटीओ क्षमता आणि २००० आरपीएम इंजिन आहे. कमी इंधन वापर, मजबूत बॉडी आणि १५०० किलो उचलण्याची ताकद यामुळे तो लहान-मोठ्या शेतांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरतो.५.६० लाख ते ५.९० लाखांच्या दरम्यान हा मॉडेल बाजारात उपलब्ध आहे.