महालक्ष्मी मार्केट हे पुण्यातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि परवडणाऱ्या होलसेल शॉपिंग सेंटरपैकी एक मानले जाते. येथे विविध प्रकारचे कपडे होलसेल दरात उपलब्ध असतात. विशेष म्हणजे, येथे असलेल्या एस. के. फॅशन या दुकानात महिलांसाठी कुर्ती, ड्रेस आणि कॉर्ड सेट अत्यंत वाजवी दरात मिळतात. दुकानातील व्यावसायिक कोमल शिंदे यांनी सांगितलं की, येथे कुर्तींची किंमत फक्त 100 पासून सुरू होते आणि डिझाईन, फॅब्रिक आणि प्रकारानुसार किंमत वाढत जाते.
advertisement
Diwali Upay : दिवाळीच्या दिवशी करा 'हे' उपाय; वाढेल समृद्धी, कधीच येणार नाही आर्थिक अडचण!
येथील कुर्तींच्या विविधतेमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. प्लेन कॉर्ड सेट, डिझायनर कुर्ती, थ्री पीस सेट, चंदेरी, गरारा, शरारा, वन पीस अशा अनेक प्रकारांमध्ये कपडे आहेत. कपड्यांमध्ये टिशू सिल्क, रोमा सिल्क, वाटिकन सिल्क, तसेच चिकनकारी वर्क असलेले डिझाईन्सही उपलब्ध आहेत. सणासुदीच्या काळात महिलांना पारंपरिक आणि स्टायलिश लूक मिळावा, यासाठी प्रत्येक प्रकारात खास डिझाईनची काळजी घेण्यात आली आहे.
ड्रेसचे दर सुमारे 300 पासून सुरू होत असून त्यापुढे फॅब्रिक आणि डिझाईननुसार किमती वाढतात. ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व साईझमध्ये एम, एल, एक्सएल, डबल एक्सएल, फोर एक्सएल आणि फाईव्ह एक्सएल पर्यंत कपडे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही आकाराच्या महिलेला येथे योग्य पर्याय मिळू शकतो.
महालक्ष्मी मार्केटमधील विक्रेत्यांनी सांगितलं की, या वर्षी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. विशेष म्हणजे, परवडणाऱ्या किमतीत ट्रेंडी आणि पारंपरिक दोन्ही पर्याय मिळतात म्हणूनच लोक पुन्हा पुन्हा येतात, असे कोमल शिंदे यांनी सांगितले.
याशिवाय, महालक्ष्मी मार्केट परिसरात फॅन्सी ड्रेस, लेहेंगा, डिझायनर साड्या आणि इथनिक ज्वेलरी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सणासुदीची संपूर्ण खरेदी पूर्ण करता येते. दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी कमी खर्चात आकर्षक पारंपरिक पोशाख घ्यायचा असेल, तर ह्या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता.
सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईत महिलांना वाजवी दरात दर्जेदार कपडे मिळणे अवघड असते, पण महालक्ष्मी मार्केटमधील एस. के. फॅशनसारखी दुकाने त्यांना एक उत्कृष्ट पर्याय देतात. त्यामुळे या दिवाळीत आपल्या कपाटात नवीन कुर्ती आणि ड्रेसची भर टाकायची असेल, तर मंडईजवळील ह्या ठिकाणी नक्की भेट द्या.