छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे दत्तू गोजे यांचा जुना मोसंबीचा बाग आहे. यापूर्वी पाऊस व्यवस्थित राहायचा, तसेच मोसंबीला भाव देखील चांगले मिळत असे. आता मात्र अतिरिक्त आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे झाडांची गुणवत्ता घसरून माल विकण्याच्या लायकीचा राहिला नाही, तर दुसरीकडे भाव नसल्याने झालेले नुकसान भरून येण्याची शक्यताही नव्हती.
advertisement
आता फळबागेला विविध प्रकारचे खत वापरणे, तसेच औषधांची फवारणी करावी लागते. पूर्वी इतका खर्च वाचत असे, आता मात्र खर्च वाढत चालला आणि उत्पन्न कमी मिळायला लागले, त्यामुळे गोजे यांनी संपूर्ण बाग काढून टाकला आहे.
मोसंबी बागेला वर्षाला 1.50 लाख रुपयांचा खर्च लागतो, तसेच उत्पन्न पाहिजे तसे मिळत नाही. जून महिन्यामध्ये मोसंबी बाग फोडायचा होता, तर पाऊस उन्हाळ्यात पडला होता, त्यामुळे झाडांना ताण बसला नाही. आता मोसंबी फोडायची होती, तर आता देखील जमिनीत ओल आहे. बाग असल्यामुळे शेतात दोन-तीन ठिकाणी विहिरी खांदल्या, पाईपलाईन केली, त्याला देखील भरपूर खर्च लागला. निसर्गामुळे मोठे नुकसान झाले, मात्र शासनाने या नुकसानाची दखल घेऊन मदत करावी, अशी मागणी गोजे यांनी केली आहे.





