मराठवाडा विदर्भात कापूस ही एक प्रमुख कॅश क्रॉप आहे. या भागातील बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने चार बाय दोन फुटावर किंवा पाच बाय दीड फुटावर कापसाची लागवड करतात. या पद्धतीत शेतकऱ्यांना एकरी आठ ते बारा क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळतं. तर कोरडवाहू शेतकऱ्यांना उत्पन्न पाच ते सहा क्विंटलपर्यंत देखील मर्यादित राहतं.
advertisement
परंतु अकोला पॅटर्ननुसार एक एकर शेतामध्ये तब्बल पाच ते सहा बॅग कपाशीची लागवड केली जाते. एका एकरात तब्बल 29 हजार कपाशीची रोपे लावली जातात. दोन रोपांमधील अंतर केवळ अर्धा फूट तर दोन ओळींमधील अंतर 3 फूट ठेवले जाते.
कपाशीची वाढ मर्यादित राहावी यासाठी वाढ रोखणाऱ्या औषधांची फवारणी केली जाते. एका झाडास दहा ते पंधरा बोंडे लगडल्यास 12 ते 18 क्विंटल उत्पन्न सहज मिळतं. हे बोंडांची संख्या वाढली तर उत्पन्न 18 ते 22 क्विंटलपर्यंत वाढत असल्याचे शेतकरी जगदीश जाधव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
कापूस लागवडीची ही पद्धत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्या शेतामध्ये एकरी पाच ते सहा क्विंटल कापसाचे उत्पन्न होतं, त्या शेतकऱ्यांनी तर अवश्य अकोला पॅटर्ननुसार कापसाची लागवड करावी, असे आवाहन देखील त्यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे.