मोहोळ तालुक्यातील शेतकरी कांतीलाल राऊत हे जर्सी कालवड म्हणजेच गायीचे वासरू आणून दूध विक्री करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गेल्या चार ते पाच वर्षांपासून कांतीलाल हे गायीचे वासरू आणून संगोपन करून त्यापासून मिळणाऱ्या दूध विक्रीकरणाचे काम करत आहेत. लहान गायीचे कालवड म्हणजेच वासरू अत्यंत कमी दरात ते खरेदी करतात आणि घरी घेऊन येतात.
advertisement
त्यानंतर त्यांचं व्यवस्थितरित्या संगोपन करून दूध विक्री करत आहेत. तसेच दुधापासून तूप तयार करून देखील बाजारात विक्री करण्याचे काम कांतीलाल करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून सुरुवातीला दोन गायीचे वासरे आणून कांतीलाल राऊत यांनी पशुपालनास सुरुवात केली होती. तर आज जवळपास त्यांच्याकडे आठ ते दहा जर्सी गायी तसेच दोन ते तीन गायीचे वासरू आहेत.
गाय किंवा वासरू आजारी पडू नये यासाठी दर दोन ते तीन महिन्याला पशुवैद्यकीय डॉक्टराला घरी आणून त्यांची तपासणी कांतीलाल हे करत आहेत. सध्या दुधाला भाव जरी नसला तरी जर्सी गायला 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत मागणी आहे. गायीच्या वासरांना लहानाचे मोठे करून त्याची विक्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दूध इथून उत्पन्न कांतीलाल हे घेत आहेत. त्या गाय विक्रीच्या व्यवसायातून वर्षाला 6 ते 7 लाखाची उलाढाल ते करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन किंवा शेळी पालन केल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळेल असा सल्ला शेतकरी कांतीलाल राऊत यांनी दिला आहे.





