TRENDING:

Farmer Success Story: रिस्क घेतली अन् टोमॅटो लागवड केली, 2 महिन्यात शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न, कशी केली शेती? Video

Last Updated:

शेतकरी संजय जारवाल यांनी 1 जूनला 2 एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. या टोमॅटो विक्रीतून 8 लाख रुपये उत्पन्न जारवाल यांना मिळाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील हसनाबादवाडी येथील शेतकरी संजय जारवाल यांनी 1 जूनला 2 एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. या टोमॅटो शेतीच्या माध्यमातून आतापर्यंत 1200 कॅरेट टोमॅटो हे विक्री झाले आहेत. या टोमॅटो विक्रीतून 8 लाख रुपये उत्पन्न जारवाल यांना मिळाले आहे, तसेच उर्वरित आणखी 800 कॅरेट टोमॅटो निघतील असा त्यांचा अंदाज असून आणखी या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होईल.
advertisement

जुलैमध्ये पुन्हा 1 एकर टोमॅटोची लागवड केलेली आहे. मात्र दोन एकर टोमॅटो शेती सध्या सुरू आहे आणि त्यातून खर्च भागत आहे. यंदा टोमॅटोला भाव चांगला मिळाला, तसेच टोमॅटोच्या दर्जेदारपणामुळे उत्पन्न चांगले निघत आहे. टोमॅटो शेती करताना अनेक रोगांचा प्रादुर्भाव त्यावर होतो. त्यामध्ये करपा, भुरी, टिपका या रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोनिका, स्कोर कवच यासह विविध औषधांची फवारणी करण्यात येते. टोमॅटो शेतीबरोबरच जारवाल हे मोसंबी, तूर आदी पिकांचे उत्पादन घेत असल्याचे जारवाल यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.

advertisement

Pune Vadapav : पुण्यात गणपती पाहायला आलात? मग हे टॉप 7 वडापाव नक्की खाल्लेच पाहिजे!

टोमॅटो शेतीत नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांनी घरची परिस्थिती चांगली असेल तसेच खर्च करण्याची तयारी असेल तर टोमॅटोची लागवड नक्कीच करायला हवी. कधी बाजारभाव कमी-जास्त मिळत असतो अशावेळी सावधानता देखील बाळगावी लागते आणि आर्थिक फटका देखील बसतो. सर्वच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करायला काही हरकत नाही मात्र या शेतीला खूप खर्च आहे. 3 एकरसाठी 3 लाख रुपये खर्च झाल्याचं देखील जारवाल यांनी म्हटले आहे.

advertisement

टोमॅटोला लागणाऱ्या पाण्यासाठी विहीर तसेच शेततळ्याचा वापर करण्यात येतो. काही वेळा जूनमध्ये पाऊस पडला नाही तर लागवडीच्या वेळी शेततळ्यातून पाणी घेऊन शेतीसाठी वापर करावा लागतो. तसेच टोमॅटोला दर तीन ते चार दिवसांनी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करावी लागत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: रिस्क घेतली अन् टोमॅटो लागवड केली, 2 महिन्यात शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न, कशी केली शेती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल