मोहोळ तालुक्यातील पापरी या गावात शंकर चव्हाण यांची 5 एकर शेती आहे. शेळीपालन व्यवसाय सुरू करत असताना त्यांनी 4 शेळ्यांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. त्या शेळ्यांपासून जन्मलेल्या बोकडांची विक्री केली आणि पुन्हा काही शेळ्या घेतल्या. आज शंकर यांच्याजवळ 20 ते 25 शेळ्या आहेत. शेळ्यांना दररोज रानात चारायला घेऊन जातात. रात्री आणि सकाळी शेळ्यांना खाण्यासाठी मक्का, सुका चारा खाण्यासाठी देतात. एका बोकडाच्या पिल्लाची किंमत 5 ते 6 हजार रुपये आहे, तर बोकडाला चांगला सांभाळलेला असेल तर 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत विक्री होते.
advertisement
महत्त्वाचे म्हणजे शेतकरी शंकर चव्हाण यांना बोकडांची विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारात किंवा इतर ठिकाणी जावे लागत नाही. स्वतः व्यापारी शंकर यांच्याकडे बोकड खरेदी करण्यासाठी येतात. तर या शेळी विक्रीच्या व्यवसायातून 2 ते 3 लाख रुपयांची कमाई करत आहेत. शेतकऱ्यांनी शेती करत करत शेळीपालनाचा व्यवसाय केल्यास नक्कीच फायदा होईल, असा सल्ला शेतकरी शंकर चव्हाण यांनी दिला आहे.





