TRENDING:

Animal Care: पाळीव प्राण्यांना जखम झालीये, घरच्या घरी करा आयुर्वेदिक उपचार

Last Updated:

Animal Care: चिखल, वातावरणातील ओलसरपणा आणि परजीवी संसर्गांमुळे श्वान, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांच्या त्वचेवर जखमा होण्याची शक्यता वाढते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: पावसाळ्यात निसर्ग मोहक दिसत असला तरी या ऋतूमध्ये अनेक समस्या देखील निर्माण होतात. विशेषत: पाळीव प्राण्यांसाठी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या काळात चिखल, वातावरणातील ओलसरपणा आणि परजीवी संसर्गांमुळे श्वान, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांच्या त्वचेवर जखमा होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर करून उपचार करणे सुरक्षित आणि परिणामकारक ठरते. कडुलिंबाचा रस, अ‍ॅलोवेरा (कोरफड) जेल आणि हळद हे तीन घटक पावसाळ्यात पाळीव प्राण्यांच्या जखमांवर उपयुक्त ठरतात.
advertisement

कडुलिंब

कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. त्याचा ताजा रस जखमेवर लावल्यास संसर्ग कमी होतो आणि जंतूंचा प्रसार थांबतो. याशिवाय कडुलिंबामुळे त्वचेवरील खाज, लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यात होणाऱ्या बुरशीजन्य संक्रमणासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. ग्रामीण भागात शतकानुशतके पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जात आहे.

advertisement

अ‍ॅलोवेरा

अ‍ॅलोवेराला घृतकुमारी म्हणूनही ओळखले जाते. कोरफड ही एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. पावसाळ्यात जखमा लवकर भरून येण्यासाठी आणि त्वचेवरील कोरडेपणा कमी करण्यासाठी अ‍ॅलोवेरा जेल उपयुक्त ठरतो. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जखमेची सूज आणि वेदना कमी करतात. अ‍ॅलोवेराचा थंडावा पाळीव प्राण्यांना आराम देतो आणि त्वचेची पुनर्रचना करण्यास मदत करतो.

Lumpy Disease: शेतकऱ्यांनो सावधान! पशुधनाला अशक्त करणारा आजार घालतोय थैमान

advertisement

हळद

हळद ही भारतातील स्वयंपाकघरात सहज आढळणारी औषधी आहे. हळदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि ब्लड प्युरिफाईंग घटक असतात. जखम लवकर भरून येण्यासाठी हळदीची पेस्ट लावल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात. हळदीतील 'करक्यूमिन' हे द्रव्य सूज कमी करून त्वचेचे आरोग्य सुधारते. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांच्या लहान-मोठ्या जखमांवर हळदीचा वापर केल्यास फायदा मिळतो.

पाळीव प्राण्यांच्या जखमांवर उपचार करताना प्रथम जखम स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. कोमट पाण्याने किंवा सौम्य अँटीसेप्टिक द्रावणाने जखम धुऊन त्यानंतर त्यावर कडुलिंबाचा रस, अ‍ॅलोवेरा जेल किंवा हळदीची पेस्ट लावावी. हे उपाय संसर्ग तर टाळतातच शिवाय जखम लवकर बरी होण्यास मदत करतात. पावसाळ्यातील ओलसर हवामानात रासायनिक मलमांपेक्षा हे नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित व परवडणारे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Animal Care: पाळीव प्राण्यांना जखम झालीये, घरच्या घरी करा आयुर्वेदिक उपचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल