advertisement

Lumpy Disease: शेतकऱ्यांनो सावधान! पशुधनाला अशक्त करणारा आजार घालतोय थैमान

Last Updated:

आपल्या राज्यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी आणि शेळ्यांसारखे पशुधन आहे. अशा शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी एक बातमी समोर आली आहे.

+
शेतकऱ्यांनो

शेतकऱ्यांनो सावधान! पशुधनाला अशक्त करणारा आजार घालतोय थैमान

सोलापूर: ज्याप्रमाणे मानवाला विविध आजारांची लागण होते त्या पद्धतीने प्राण्यांना देखील आजार होतात. आपल्या राज्यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी आणि शेळ्यांसारखे पशुधन आहे. अशा शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या जनावरांमध्ये लम्पी या आजाराची साथ पसरली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने एका जनावरापासून गोठ्यातील इतर जनावरांना त्यांची बाधा होवू शकते. शेतकऱ्यांनी या आजारावर काय उपाय करावेत ? जनावरांची कशी काळजी घ्यावी याबाबत लोकल 18ने, सोलापूर कृषी विज्ञान केंद्रातील अभ्यासक डॉ. तानाजी वळकुंडे यांच्याशी संवाद साधला.
सध्या पावसाळा हा ऋतू सुरू असून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही ठिकाणी वातावरणात कमालीचा दमटपणा जाणवत आहे. त्यामुळे सोलापुरातील जनावरांना मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराची लागण झाली आहे. प्रामुख्याने देशी गायी आणि म्हशी या आजाराला बळी पडत आहेत.
लम्पी आजाराची लक्षणे
जनावरांना ताप येणे, हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय दूधामध्ये घट होणे, जनावरांचे पाय, खांदे आणि मानेवरती 10 ते 50 मिली मीटरच्या गाठी येणे, डोळ्यांतून पाणी वाहणे, ही देखील आजाराची लक्षणं आहेत. लम्पीची लागण झाल्यास जनावरांचा आहार देखील कमी होतो. हा एक विषाणूजन्य आजार असून त्यावरती ठोस उपाय नाही.
advertisement
प्रतिबंधात्मक उपाय
आपल्या जनावरांना हा आजार होऊ नये म्हणून जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जर एखाद्या जनावराला लम्पीची लागण झाली तर त्याला इतर निरोगी जनावरापासून लांब बांधावे. जनावरांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून निरोगी जनावरांना हा आजार होणार नाही. गायी आणि म्हशींना हा आजार होऊ नये म्हणून पशुपालकांनी गोठ्याची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
advertisement
मेटॅरायझियम (Metarhizium) या औषधाची 5 ग्रॅम पावडर एक लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली तर गोठ्यामध्ये डास आणि माशांचे प्रमाण कमी होते. संध्याकाळच्या वेळी गोठ्याजवळ कडूलिंबाच्या पाल्याचा धूर केल्यास कीटक जनावरांपासून दूर राहतात. जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली तर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील अभ्यासक डॉ.तानाजी वळकुंडे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Lumpy Disease: शेतकऱ्यांनो सावधान! पशुधनाला अशक्त करणारा आजार घालतोय थैमान
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement