कुंभेफळ येथील रवी वाघ हे गाय पालनाच्या माध्यमातून दूध व्यवसाय करत आहेत. गाईंचे दिवसभराचे व्यवस्थापन करण्यासाठी सकाळी पाच वाजता सर्व गाईंचे दूध काढावे लागते, त्यानंतर त्यांचा चारा आणि वैरणाची सोय केली जाते. चाऱ्यामध्ये मेथी घास आणि काही प्रमाणात सुका घास दिला जातो.
Success Story : 10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल
advertisement
म्हशी आणि गाईंसाठी लागणारा चाऱ्यातील घास हा वर्षभराचा एकदाच साठवला जातो. जशी गरज भासेल त्या पद्धतीने या घासाचा वापर केला जातो. तसेच जनावरांना पाण्यासाठी गोठ्याजवळच मोठा हौद देखील आहे. जनावरांना मोकळे सोडले की चारा खातात आणि पाणीही पितात, त्यामुळे गाय पालन अवघड जात नाही, असे देखील वाघ यांनी म्हटले आहे.
गाय पालन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे?
नवीन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कमी जनावरांपासून सुरुवात करावी. गोठ्याची आणि योग्य खाद्याची व्यवस्था करावी. गायपालन, म्हैस पालन असो या व्यवसायामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्यास आणखी जनावरांची वाढ करता येऊ शकते. तसेच मुक्त गोठा पद्धत वापरल्यास जास्त मेहनत करण्याची आवश्यकता भासत नाही.





