मनुष्य योनीत जन्म किती वेळाने मिळतो?
मनुष्य योनीतील जन्म हा वारंवार मिळत नाही. 84 लाख योनींचा प्रवास केल्यानंतर आत्मा मनुष्य रूपात येतो, असे मानले जाते. या योनींमध्ये जलचर, कीटक, पक्षी, पशू अशा अनेक प्रकारच्या योनींचा समावेश असतो. एकदा मनुष्य जन्म गमावल्यास, आत्म्याला पुन्हा मनुष्य योनीत येण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात, म्हणूनच 'मनुष्य जन्म दुर्मीळ आहे' असे म्हटले जाते.
advertisement
सतत अपमान आणि शिवीगाळ केल्याचे परिणाम
दुःखदायक पुनर्जन्म: इतरांना सतत अपमानास्पद शब्द बोलल्यास किंवा शिवीगाळ केल्यास, पुढील जन्मात तुम्हाला पशु योनीत जन्म मिळतो, जिथे तुम्हाला बोलण्याची क्षमता नसते आणि तुम्ही स्वतःचे दुःख व्यक्त करू शकत नाही.
मानसिक क्लेश: या जन्मात, इतरांना दुखावल्यामुळे तुम्हाला नेहमी मानसिक क्लेश, चिंता आणि एकटेपणा जाणवतो. तुमच्या वाईट बोलण्यामुळे तुमच्या जवळचे लोक दूर जातात.
धन-संपत्तीचे नुकसान: गरूड पुराणानुसार, जो व्यक्ती सतत कठोर आणि अपमानास्पद बोलतो, त्याच्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. त्याला धन-संपत्तीचे मोठे नुकसान होते.
वाणीचा शाप: पुढील जन्मात तुम्हाला वाणीशी संबंधित दोष किंवा तोंडाचे आजार होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला बोलण्यात अडचण येते.
सामाजिक अपमान: तुम्ही इतरांचा जितका अपमान कराल, तितकाच तुमचा सामाजिक स्तरावर अपमान होतो. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळत नाही आणि तुमची प्रतिमा खराब होते.
अशुभ कर्म: कठोर शब्द वापरणे हे अशुभ कर्म मानले जाते. या कर्मांमुळे तुमच्या चांगल्या कर्मांची शक्ती कमी होते आणि तुमच्या आयुष्यात अडचणी आणि नकारात्मकता वाढते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
