TRENDING:

Buddha Purnima 2025: बुद्ध पौर्णिमा नेमकी कधी आहे? रवि योगात पूजेचा मुहूर्त, पहा विधी-महत्त्व-उपाय

Last Updated:

Buddha Purnima 2025 Date: बौद्ध धर्मातील लोकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. यंदाची बुद्ध पौर्णिमा कधी, बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवि योग तयार होत असून भद्रकाळही आहे. रवि योग हा एक शुभ योग मानला जातो. बौद्ध धर्मातील लोकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. यंदाची बुद्ध पौर्णिमा कधी, बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

बुद्ध पौर्णिमा २०२५ तिथी - वैदिक दिनदर्शिकेनुसार, वैशाख शुक्ल पौर्णिमा तिथी रविवार, 11 मे रोजी रात्री 8:01 वाजता सुरू होत आहे. ही तिथी सोमवार, १२ मे रोजी रात्री १०:२५ वाजेपर्यंत वैध असेल. त्यामुळे 12 मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. म्हणजेच बुद्ध पौर्णिमा सोमवार, १२ मे रोजी आहे.

बुद्ध पौर्णिमेला रवियोग आणि भद्रकाळ -

advertisement

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवि योग असतो आणि पाताळातील भद्रा आहे. रवि योग सकाळी ५:३२ वाजता तयार होईल आणि सकाळी ६:१७ पर्यंत चालू राहील. रवि योगात सर्व प्रकारचे दोष दूर होतात. त्या दिवशी भद्रकाळ सकाळी ०५:३२ वाजता सुरू होईल आणि सकाळी ०९:१४ पर्यंत चालेल.

या वर्षी गौतम बुद्धांची २५८७ वी जयंती -

advertisement

१२ मे रोजी वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांची २५८७ वी जयंती साजरी केली जाईल. या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी प्रार्थना करतात, भगवान बुद्धांच्या शिकवणींचे पालन करण्याची प्रतिज्ञा करतात. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी येथे झाला, ते ठिकाण आता नेपाळमध्ये आहे.

गुरू बृहस्पतिचा अस्त! या राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, थेट खात्यावर पैसा

advertisement

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व - बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या लोकांसाठी अत्यंत खास दिवस आहे. भगवान बुद्ध महान व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या जीवनाशी संबंधित तीन प्रमुख घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. ज्या दिवशी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले तो दिवसही वैशाख पौर्णिमा होता. भगवान बुद्धांनी आपले जीवन सोडले तेव्हा त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. बुद्धांना बोधगया, बिहार येथे ज्ञान प्राप्त झाले आणि कुशीनगर येथे त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Buddha Purnima 2025: बुद्ध पौर्णिमा नेमकी कधी आहे? रवि योगात पूजेचा मुहूर्त, पहा विधी-महत्त्व-उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल