TRENDING:

Numerology: 2, 11, 20, 29 या जन्मतारखा आहेत का? मोठी खुशखबर, जीवनात सुख परतणार

Last Updated:

Marathi Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2 ऑक्टोबर 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमचं मत व्यवस्थित ऐकतील. मुलांमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. आज तुमच्या कल्पनांना विरोध होऊ शकतो, काळजी घ्या. अशा परिस्थितीत चिकाटी ठेवा, फायद्याचं राहील. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संबंधासाठी उत्तम दिवस आहे. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणारं नातं तुटणार तर नाही ना, अशी चिंता तुम्हाला वाटेल. पण परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

advertisement

Lucky Colour : Violet

Lucky Number : 8

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही अध्यात्माकडे आकर्षित होऊ शकता. स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कराल, त्यासाठी ही योग्य वेळ आहे. मुलांच्या शाळेतून चांगली बातमी आल्यानं घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला नाही. जोडीदाराला तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही कमी पडू शकता, काळजी घ्या.

advertisement

Lucky Colour : Light Grey

Lucky Number : 11

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज खरी व खोटी माहिती यामधील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं संवाद कौशल्य, कष्ट करण्याची तयारी यामुळे तुम्ही विविध अडथळ्यांवर सहज मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. आज कष्ट केल्यानं पैसा मिळेल. यश मिळेल. व्यवसायात नफा होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे.

advertisement

Lucky Colour : Pink

Lucky Number : 7

बुधवार या राशींसाठी लकी! शुभ ब्रह्मा योगात चमकणार नशीब, आरोग्य-धनसंपदा

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भावंडांमध्ये असणाऱ्या शत्रुत्वाच्या भावनेमुळे चिंता वाढेल. मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण होईल, काळजी घ्या. विरोधकांना शांत करण्यासाठी फार वेळ लागणार नसला तरी सावध राहा. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल, ते पूर्णत्वाला जाईल. विश्रांतीला प्राधान्य द्या. जोडीदाराला वेळ देणं फायद्याचं ठरेल. वीकेंडला एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता.

advertisement

Lucky Colour : Cream

Lucky Number : 3

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा, त्यासाठी योग्य वेळ आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आलेले वाईट अनुभव हळूहळू दूर होतील. आर्थिकदृष्ट्या जमीन किंवा इतर स्थावर मालमत्तेचं नुकसान होऊ शकते, काळजी घ्या. शारिरीक, मानसिक तंदुरुस्ती राहील. कार्यक्षमता वाढेल. नातेसंबंधाच्या बाबतीत पूर्वी तुमच्या जीवनातील महत्त्वाची असणारी व्यक्ती अनपेक्षितपणे समोर येऊ शकते.

Lucky Colour : Yellow

Lucky Number : 18

12 वर्षांनी आला मोठा योग, 4 राशींचं उजळणार नशीब; आर्थिक संकट होतील दूर

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही तुमच्या चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल, पण डोक्यात हवा जाणार नाही, याची काळजी घ्या. अनपेक्षित वादामुळे नेमकं काय घडतं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, सावध राहा. आर्थिकदृष्ट्या पैसे किंवा मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. नोकरदारांची पदोन्नती होईल. एखाद्या व्यक्तीशी फ्लर्ट करू नका. अन्यथा तुम्ही कितीही चांगले वागलात तरी उपयोग होणार नाही. तुमची प्रशंसा होण्याची शक्यता कमी राहील.

Lucky Colour : Baby Pink

Lucky Number : 2

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भावंडांसोबतचं नातं तणावपूर्ण राहील. मनामध्ये असंतोषाची भावना असेल. आज तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. शेअर बाजारात गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. विचारपूर्वक गुंतवणूक करा. प्रेमाच्या बाबतीत नव्यानं नातं जोडलं जाण्याची शक्यता आहे.

Lucky Colour : Electric Grey

Lucky Number : 17

त्रासाचे दिवस खूप काळ सोसले! या राशींचे आता पालटणार नशीब; व्रक्रीगुरू सगळं देणार

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

ऑफिसमध्ये वरिष्ठांना सामोरं जाणं त्रासदायक ठरू शकते. अशा परिस्थितीत संयम ठेवा. वादात पडू नका. कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर त्यासाठी चांगली वेळ आहे. पदोन्नती किंवा महत्त्वाचा व्यवसाय करार करण्यासाठी उत्तम दिवस आहे. जोडीदाराचं मन सांभाळण्यास प्राधान्य देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Lucky Colour : Baby Pink

Lucky Number : 7

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही अशा परिस्थितीत सापडू शकता ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा व तुम्ही आजपर्यंत जो मानसन्मान कमावला आहे, तो पणाला लागू शकतो. काळजी घ्या. आज बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन करू शकता. दररोज मॉर्निंग वॉकला जाणे, व्यायाम करणे फायद्याचं ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुमच्यावर असणारं कर्ज फेडू शकता. त्यासाठी अनुकूल वेळ आहे. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या प्रेमातील पूर्णत्वाचा क्षण आज येऊ शकतो.

Lucky Colour : Purple

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

Lucky Number : 9

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: 2, 11, 20, 29 या जन्मतारखा आहेत का? मोठी खुशखबर, जीवनात सुख परतणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल