दसऱ्याला झाडू खरेदी करा - धनत्रयोदशी व्यतिरिक्त दसऱ्यादिवशी झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते, कारण हिंदू धर्मात त्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू आपल्या घरातील अशुद्धता, नकारात्मकता आणि गरिबी दूर करतो, ज्यामुळे देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि संपत्ती आणि समृद्धी येते. म्हणून, दसऱ्याला झाडू खरेदी करणे आवश्यक आहे.
advertisement
दसऱ्याला झाडू का खरेदी करावा?
दसऱ्याला खरेदी केलेला झाडू हा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी वापरता येऊ शकतो. तसेच दसऱ्या दिवशी झाडू खरेदी करणे ही एक नवीन शुभ सुरुवात आहे.
खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती
वास्तुशास्त्रानुसार, झाडू घरातील वास्तुदोष दूर करतो. त्यामुळे आर्थिक लाभ देखील होतो आणि आपले भाग्य उजळते. दसऱ्याला घरात झाडू आणल्यानं जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांमध्ये नवीन संधी निर्माण होतात. घरातून नकारात्मकता दूर होते, ज्यामुळे आनंद आणि शांती येते.
दसऱ्यासाठी झाडू-उपाय - दसऱ्यादिवशी सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घालून पूजा करा. त्यानंतर, बाजारातून गवत किंवा बांबूपासून बनवलेला झाडू आणा. अधिक शुभतेसाठी लाल कपड्यात गुंडाळा. एकादशीला त्याचा वापर सुरू करा. घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)