मेष - मेष राशीच्या लोकांनी दसऱ्याला भगवान राम आणि हनुमानाची पूजा करावी. गहू आणि गूळ दान करा. घरी-शेजारी शमीचे झाड लावावे.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी दसऱ्याला देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि कमळाची फुले अर्पण करावीत. मुलींना खीर प्रसाद वाटावा. तांदूळ आणि पीठ दान करावे.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी शमीचे झाड लावावे आणि त्याची पूजा करावी. तसेच गरिबांना फळे दान करावीत.
advertisement
कर्क - राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी प्रभु श्रीरामाची पूजा करावी आणि नैवेद्य म्हणून खीर किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाई अर्पण कराव्यात. दिवसा दूध आणि दही दान करावे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी सूर्य देवाची पूजा करावी आणि त्यांना अर्घ्य अर्पण करावे. दसऱ्याच्या दिवशी गूळ, शेंगदाणे आणि सफरचंद दान करावे.
कन्या - कन्या राशीच्या लोकांनी आज शमीचे झाड लावावे आणि गरिबांना अन्न द्यावे. हिरव्या बांगड्या आणि कपडे दान करावे.
खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी आज देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि पांढरी मिठाई अर्पण करावी. गरजूंना तांदूळ, पांढरे कपडे आणि पैसे दान करावे.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी श्री राम दरबार आणि हनुमानाची पूजा करावी. नैवेद्य म्हणून लाल मिठाई अर्पण करावी. गरजूंना लाल सफरचंद आणि कपडे दान करावे.
धनू - राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करावी. पिवळे कपडे आणि अन्न दान करावे. गरिबांना अन्न द्यावे.
मकर - राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान रामाची पूजा करावी. तसेच शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि गरिबांना अन्न द्यावे.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी दसऱ्याला राम दरबार स्थापन करून त्याची पूजा करावी. घरी शमीचे झाड लावावे. गरजूंना अन्न आणि कपडे दान करावे.
मीन - मीन राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या पूजेदरम्यान पिवळी मिठाई अर्पण करावी. गरीब आणि गरजूंना जेवण द्यावे.
दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)