TRENDING:

Kalashtami December 2025: प्रीति योगात डिसेंबरची कालाष्टमी; काळभैरवाच्या पूजेची सुवर्णसंधी, इतक्या गोष्टींमध्ये लाभ

Last Updated:

Kalashtami December 2025 Date: द्रिक पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथी 11 डिसेंबर रोजी दुपारी 1:56 पासून सुरू होईल आणि 12 डिसेंबर रोजी दुपारी 2:56 पर्यंत असेल. कालाष्टमी आणि जन्माष्टमीची पूजा निशिता मुहूर्तावर होते, त्यामुळे कालाष्टमीचा उपवास 11 डिसेंबर रोजी केला जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डिसेंबरची महिन्याची कालाष्टमी आणि मासिक जन्माष्टमी गुरुवार 11 डिसेंबर रोजी आहे. द्रिक पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथी 11 डिसेंबर रोजी दुपारी 1:56 पासून सुरू होईल आणि 12 डिसेंबर रोजी दुपारी 2:56 पर्यंत असेल. कालाष्टमी आणि जन्माष्टमीची पूजा निशिता मुहूर्तावर होते, त्यामुळे कालाष्टमीचा उपवास 11 डिसेंबर रोजी केला जाईल. या दिवशी पूजेच्या वेळी प्रीति योग तयार होतोय. पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या तिथीला अष्टमी तिथी असते त्या तिथीला हे व्रत केले जाते.
News18
News18
advertisement

कालाष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त -

पंचांगानुसार अभिजीत मुहूर्त गुरुवारी सकाळी 11.54 पासून सुरू होईल आणि 12.35 पर्यंत असेल. राहुकालची वेळ दुपारी 1:32 पासून सुरू होऊन दुपारी 2:50 पर्यंत असेल. कालाष्टमीच्या दिवशी सकाळी 11.40 ते मध्यरात्रीपर्यंत प्रीति योग आहे. कालाष्टमी पूजेसाठी निशिता मुहूर्त रात्री 11:47 ते 12:42 पर्यंत आहे.

काळभैरवाची पूजा करण्याचे फायदे -

advertisement

कालाष्टमीचा दिवस काळभैरवाला समर्पित आहे. या दिवशी काळभैरवाचे पूजन केल्याने व्यक्तीला जीवनातील भय, अडचणी आणि शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळते. भैरव चालीसा, भैरव स्तोत्र किंवा ओम कालभैरवाय नमः मंत्राचा विशेषत: रात्री जप केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतील.

काळभैरवाला उडीद डाळ, काळे तीळ आणि मिठाई अर्पण करा. याशिवाय कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते, कारण कुत्रा हा काळभैरवाचे वाहन मानला जातो. काळभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात.

advertisement

करेल त्याचे उलटे परिणाम, बुधवारपासून या राशी अडचणीत; बुधगोचर अनलकी ठरेल

जन्माष्टमीच्या पूजेने पाप नष्ट होतात -

मासिक कृष्ण जन्माष्टमीही याच तिथीला आहे. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने कीर्ती, वैभव, धन आणि संततीपासून सुख प्राप्त होते. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो.

advertisement

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला होता, म्हणून दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मासिक कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. जन्माष्टमीची पूजा बहुतेक रात्री केली जाते, म्हणून मासिक कृष्ण जन्माष्टमी 11 डिसेंबर रोजीच साजरी केली जाईल.

साडेसाती असो की अडीचकी..! शनिदोषातून सुटका मिळवण्यासाठी ही फुले शनिला अर्पण करा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक, घरीच बनवा अळीवची खीर, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kalashtami December 2025: प्रीति योगात डिसेंबरची कालाष्टमी; काळभैरवाच्या पूजेची सुवर्णसंधी, इतक्या गोष्टींमध्ये लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल