TRENDING:

Numerology: दसरा लकी..! मालमत्ता, वाहन खरेदीसाठी या मूलांकाना शुभकाळ; गुरुवारी आर्थिक लाभाचे योग

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 02 ऑक्टेबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मूलांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी अस्वस्थ आणि त्रासदायक असण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. एकामागून एक अडचणी वाढू लागल्यानं मनःशांती राहणार नाही. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा सर्वोच्च राहील. नोकरीची संधी येईल. प्रेमाच्या बाबतीत आज जोडीदाराला त्रास होईल असं वागू नका, फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : White

Lucky Number : 5

मूलांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

सण-उत्सवाच्या काळात आज घरातील वाद टाळा. तुमचा दिवस मुलांच्या सहवासात आनंदात जाईल. तुमच्या जमिनीचं किंवा मालमत्तेचं काही कारणानं नुकसान होऊ शकतं. आज तुम्हाला कष्टाच्या तुलनेत नफा जास्त मिळेल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

Lucky Colour : Electric Grey

Lucky Number : 8

मूलांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

गुरुवार तसा लकी आहे, सरकारी काम मार्गी लागेल. शिकलेलं नवीन कौशल्यं तुम्हाला पैसा मिळवून देईल. थंडी-ताप येऊ शकतो. ऊबदार कपडे वापरा. खर्च वाढल्याने पैशांची चणचण भासेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी संयमानं वागा. जोडीदाराला थोडा वेळ द्या, फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : Light Grey

Lucky Number : 17

मूलांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

सण-उत्सवाचा काळ तुमच्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचा ठरेल. तुमच्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय राहील. आर्थिकदृष्ट्या समृद्धी येईल. ऑफिसमध्ये बॉसशी मतभेद होऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, काळजी घ्या.

Lucky Colour : Dark Yellow

Lucky Number : 9

दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप

advertisement

मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कुटुंबात लोकांना तुमचं म्हणणं पटणार नाही. गोष्टींमध्ये फार रस नसेल. मन:शांती तुमच्यापासून दूर राहील. तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा. जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे. आजचा दिवस खूप खर्चाचा आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमावर खर्च होईल. प्रेमाच्या बाबतीत परिपूर्ण जोडीदार आज तुम्हाला भेटू शकतो.

Lucky Colour : Yellow

Lucky Number : 2

मूलांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

कार्यक्रमांचे वातावरण असल्यानं आज तुम्ही सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. आध्यात्मिक शिक्षणाकडे तुमचा कल राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. थोडं अस्वस्थ वाटेल. शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळेल. जोडीदाराला पाठिंबा द्या. तुमचं नातं अधिक दृढ होईल.

Lucky Colour : Baby Pink

Lucky Number : 6

मूलांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दसरा लकी ठरू शकतो, कारण सरकारी कामं मार्गी लागतील. आर्थिक समृद्धी होईल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुम्ही स्वतःसाठी निश्चित केलेली उद्दिष्टं सहज साध्य कराल. प्रेमाच्या बाबतीत नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.

Lucky Colour : Dark Green

Lucky Number : 5

खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती

मूलांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रामाणिक असण्याची सवय तुम्हाला चांगल्या स्थितीत आणेल. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. आरोग्याची काळजी घ्या. नवीन व्यावसायिक भागीदारी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. इतरांसाठी आज प्रेरणादायी ठरू शकता. त्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे.

Lucky Colour : Dark Turquoise

Lucky Number : 4

मूलांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सण-उत्सवांमध्ये कामांचा धडाका असेल, आज कठोर परिश्रम यश देईल. वैयक्तिक लाभ होईल. आज तुमच्या मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या कल्पना एखाद्याला मनापासून प्रभावित करतील. प्रयत्नांचं फळ मिळेल.

Lucky Colour : Parrot Green

Lucky Number : 15

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: दसरा लकी..! मालमत्ता, वाहन खरेदीसाठी या मूलांकाना शुभकाळ; गुरुवारी आर्थिक लाभाचे योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल