TRENDING:

Shravan: श्रावण पाळायचा म्हणजे त्यात शारीरिक संबंध पण टाळावेत का? शास्त्र काय सांगतंय पहा

Last Updated:

Physical Relationship During Shravan 2025: श्रावणी सोमवारी शिवपूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अविवाहित मुलींना चांगला वर मिळतो, तर विवाहित स्त्रियांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते. श्रावण महिन्यात स्वतः काही नियम पाळले पाहिजेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महादेवाचा प्रिय श्रावण महिना २५ जुलै २०२५ पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान शंकराला समर्पित असतो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करतात. बेलपत्र, धोतरा, आकडा, चंदन, भांग, फुले इत्यादी अर्पण करून शिवशंकराची पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रावणी सोमवारी शिवपूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अविवाहित मुलींना चांगला वर मिळतो, तर विवाहित स्त्रियांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते. श्रावण महिन्यात स्वतः काही नियम पाळले पाहिजेत. श्रावण महिन्यात काही गोष्टी करणं कटाक्षानं टाळावं. विशेषतः उपवास करणाऱ्या व्यक्तीने श्रावणातील काही नियमांचे पालन केले पाहिजे. श्रावणात शारीरिक संबंध ठेवण्याबाबत माहिती जाणून घेऊया.
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
advertisement

श्रावणात शारीरिक संबंध ठेवावेत की नाही?

श्रावण महिन्यात शिवभक्त पूर्ण श्रद्धेने भक्तीत मग्न असतात, विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, कोणत्याही धार्मिक विधीपूर्वी आणि दरम्यान शारीरिक संबंध ठेवू नयेत. तुम्ही श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उपवास करत असाल किंवा श्रावण महिन्यात पूजा करणार असाल, तर तुम्ही शारीरिक संबंध ठेवू नयेत. म्हणजेच श्रावणात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.

advertisement

श्रावण महिन्यात शारीरिक संबंध का ठेवू नयेत?

धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. असे करणारे लोक पापाचे धनी होऊ शकतात. यामुळे उपवास आणि पूजेचे पूर्ण फळ मिळू शकणार नाही, ज्यामुळे देवाधिदेव महादेव क्रोधित होऊ शकतात.

गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात

advertisement

शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल धार्मिक श्रद्धा काय?

पौराणिक ग्रंथांनुसार, कामदेवाला प्रेम आणि वासनेचा कारक मानले जाते. तर शंकराला कल्याणाचा कारक मानले जाते. श्रावण महिन्यात कामदेवानं महादेवावर बाण मारला होता, त्यानंतर क्रोधित होऊन महादेवानं त्याला त्याच क्षणी जाळून टाकले होते. श्रावण महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे हे पाप आहे, याचे हे देखील एक कारण मानले जाते.

advertisement

श्रावणाव्यतिरिक्त कधी शारीरिक संबंध ठेवू नयेत?

धार्मिक श्रद्धेनुसार, श्रावण महिन्याव्यतिरिक्त अमावस्या, चतुर्थी तिथी, पौर्णिमा तिथी, अष्टमी, रविवार, श्राद्ध पक्ष, संक्रांती व्रत आणि नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवू नयेत. यामुळे पाप होऊ शकते. याशिवाय तुम्हाला देव-देवतांच्या क्रोधालाही सामोरे जावे लागू शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

आत्तापर्यंत चालून गेलं! वर्ष 2025 मधील शेवटचे 6 महिने या राशींसाठी खडतर, संकटे

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan: श्रावण पाळायचा म्हणजे त्यात शारीरिक संबंध पण टाळावेत का? शास्त्र काय सांगतंय पहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल