कोल्हापूर : स्वयंपाकघरात रोजच्या जेवणात वापरले जाणारे मसाले हे केवळ जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाहीत, तर माणसाच्या जीवनातील अनेक समस्यांपासून देखील मुक्ती मिळवून देऊ शकतात. या मसाल्यांचा वापर केल्याने आपले भाग्य उजळवू शकते. मसाले वापरण्याचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या बऱ्याच अंशी कमी करू शकता. याबाबत कोल्हापूरचे ज्योतिष अभ्यासक अरविंद वेदांते गुरुजींनी माहिती दिली आहे.
advertisement
खरंतर आपले पूर्वज खूप हुशार होते, त्यांनी अनेक औषधी वनस्पती आणि झाडांपासून आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ बनवले. मसाल्याच्या रूपात त्याला आपल्या अन्नाचा एक भाग बनवला. यापैकी काही मसाल्यांचे अतिसेवन शरीरासाठी अपायकारक ठरते. मात्र याच मसाल्यांचा मानवी समस्यांच्या सोडवणुकीत देखील महत्वाचा वाटा ठरतो, असे वेदांते गुरुजी सांगतात.
नशीबवान असतात या स्त्रिया; शरीरावर अशा ठिकाणी तीळ श्रीमंती आणतात
कोणते मसाले कसे पडतात उपयोगी?
मीठ : मीठ हा तसा रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक आहे. ज्याच्या कुंडलीतील ग्रहांमध्ये सूर्य आहे, त्यांनी मिठाचे नियमित सेवन केले पाहिजे. कारण मिठाचा सूर्याशी संपर्क वाढलेला असतो. त्याचबरोबर ग्रहांतील सूर्याला मीठमिश्रित पाणी अर्पण केल्यामुळे सूर्य ग्रह कुंडलीमध्ये बलवान राहतो.
जिरे : जिरे हा प्रत्येक पदार्थाच्या फोडणीमधील मसाल्याचा पदार्थ आहे. खर तर जिरे हा पदार्थ राहू आणि केतूशी संबंधित आहे. जर राहू केतू संबंधित समस्या असतील तर दर मंगळवारी दह्यामध्ये जिरे मिसळून त्यांचे सेवन केले जावे. असे केल्यास सुख, शांती, समृध्दी मिळते. त्याचबरोरीने असे केल्याने घराची प्रगती होते.
तुमचं लकी फुल माहीत आहे? जन्मतारखेच्या महिन्यानुसार या रंगाची फुलं शुभ
लाल मिरची : लाल मिरची देखील मसाल्यामध्ये बदलता वापरली जाते ही लाल मिरची मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. बऱ्याच जणांना कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा त्रास असतो. जर कुणाच्या कुंडलीमध्ये मंगळ अनिष्ट किंवा त्रासदायक असेल, तर लाल मिरची दान करणे या उपाय करता येईल. यामुळे मंगळ ग्रहाचा त्रास थोडा कमी होतो.
धने / कोथिंबीर : धने किंवा कोथिंबीर यांचे देखील औषधी गुणधर्म असल्यामुळे रोजच्या जेवणात आवर्जून यांचा वापर केला जातो. खरंतर पाण्यामध्ये मिसळून रोज धने किंवा कोथिंबीरचे सेवन करणे कुंडलीतील ग्रहांसाठी त्याचबरोबर शारीरिक आरोग्यासाठी देखील फायदेशीरच ठरते.
एकंदरीतून सर्व मसाल्यांच्या पदार्थांकडे पाहिले तर काही मसाल्याचे पदार्थ हे ज्योतिषशस्त्राशी संबंधित आहेत. शरीरासाठी जरी त्यांचे अतिसेवन अपायकारक असले तरी त्यांचा उपयोग अशा भाग्य उजळण्यासाठी देखील होऊ शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)