चैत्र नवरात्रीपेक्षाही शारदीय नवरात्रीलाही हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. धार्मिक परंपरेनुसार, दरवर्षी अश्विन महिन्यात येणाऱ्या या सणाची भाविक आतुरतेने वाट पाहतात. या काळात देशभरात विविध ठिकाणी दुर्गेच्या मूर्ती स्थापित केल्या जातात आणि भाविक नऊ दिवस उपवास, पूजा, गरबा, जागरता असे धार्मिक कार्यक्रम करतात. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शारदीय नवरात्र ही सर्वोत्तम संधी मानली जाते. या काळात दुर्गा पूजेसारखे विशेष विधी केले जातात. असे मानले जाते की या नऊ दिवसांत देवी दुर्गा पृथ्वीवर भ्रमण करते आणि तिच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करते. या वर्षी शारदीय नवरात्र कधी आहे आणि घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, याविषयी जाणून घेऊया.
advertisement
शारदीय नवरात्र २०२५ कधी सुरू होते?
हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी शारदीय नवरात्र २२ सप्टेंबर २०२५, सोमवार रोजी सुरू होत आहे. तर २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याला तिची सांगता होईल. नवरात्राची सुरुवात अश्विन शुक्ल प्रतिपदेला होतेय, म्हणजे सर्व पितृअमावस्येच्या नंतरच्या दिवशी येते.
शारदीय नवरात्री 2025 शुभ मुहूर्त
घटस्थापना मुहूर्त- सकाळी ६:०९ ते ८:०६
अभिजित मुहूर्त- दुपारी 11:49 ते 12:38 पर्यंत
दुर्गा देवीची पूजा: शारदीय नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची (शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री) पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची आराधना केली जाते, ज्यामुळे वेगवेगळ्या शक्ती आणि आशीर्वादांची प्राप्ती होते.
वाईटावर चांगल्याचा विजय: नवरात्री हा अधर्म आणि वाईट शक्तींवर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, देवी दुर्गाने नऊ दिवस आणि नऊ रात्री महिषासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला होता. हा विजय वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
शक्तिपूजा: हिंदू धर्मात देवीला 'शक्ती' चे प्रतीक मानले जाते. नवरात्रीमध्ये स्त्रीशक्ती आणि तिच्या विविध रूपांची पूजा करून समाजात महिलांच्या सन्मानाचा संदेश दिला जातो.
आत्मशुद्धी आणि साधना: नवरात्रीचे नऊ दिवस भक्त उपवास, पूजा, ध्यान आणि जप करून आत्मशुद्धी करतात. हे दिवस आध्यात्मिक प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येईल - यावेळी नवरात्र सोमवारपासून सुरू होत आहे, म्हणून देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येईल. हत्तीला शुभ, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हत्तीचं वाहन असल्यानं नवरात्रीची सुरुवात भक्तांसाठी शुभ मानली जात आहे.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)