या 20 चांगल्या गोष्टींमुळे शनीचे विशेष आशीर्वाद मिळतात -
जे लोक नियमितपणे नखे कापून त्यांची स्वच्छता ठेवतात, अशा लोकांना शनिदेव त्रास देत नाही.
जे लोक गरजूंना मदत करतात, त्यांना दान करतात, अशा लोकांना शनिचा विशेष आशीर्वाद मिळतो. शनिवारी गरिबांना काळे तीळ, काळी डाळ, काळे जोडे इत्यादी दान करणे शुभ मानले जाते.
advertisement
छत्री दान करणाऱ्यांवर शनिदेवाच्या आशीर्वादाची छाया नेहमीच राहते.
कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांना शनी कधीही त्रास देत नाही. शनिदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते.
अंध व्यक्तीला मदत करणाऱ्या लोकांवर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो.
शनिवारी उपवास करून आणि गरजू, भुकेल्या व्यक्तीला आपल्या वाट्याचे अन्न दिल्याने शनीचे भय राहत नाही.
आता चांगले दिवस सुरू! नक्षत्र बदलल्यानं 3 राशींना नशिबाची साथ, भाग्योदयाचे योग
गरजूंना मासे खाऊ घालणाऱ्या लोकांना शनि नेहमीच प्रसन्न करतो.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना मदत करणाऱ्यांना शनीच्या साडेसातीचा त्रास होत नाही.
वृद्ध आणि असहाय्य लोकांना मदत करणारे, त्यांचा आदर करणारे लोक शनिदेवाचा आशीर्वाद मिळवतात.
महादेवाची पूजा करणाऱ्यांना शनीचा विशेष आशीर्वाद मिळतो.
जे लोक त्यांच्या पूर्वजांचे नियमित श्राद्ध करतात त्यांना शनी साडेसाती किंवा अडीचकीचा त्रास होत नाही.
जे लोक प्रामाणिकपणे आपले जीवन जगतात त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
हनुमानाची नियमित पूजा करणाऱ्यांना कधीही शनिदोषाचा त्रास होत नाही.
श्रीकृष्णाची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्तता मिळते. अपंगांना मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि प्रगती होते.
जे लोक मद्यपान करत नाहीत त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
शाकाहारी अन्न खाणाऱ्या व्यक्तीला शनिदेव कधीही दुःखी करत नाहीत.
सातमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या लोकांना शनिदेवाकडून शुभ फळे मिळतात.
कुष्ठरोग्यांना मदत करणाऱ्या लोकांना शनिदेवाकडून खूप आशीर्वाद मिळतात.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)