नुकताच दहावीचा निकाल लागला असून दहावीनंतर अनेकजण आयटीआयचा पर्याय निवडतात. आयटीआय मध्ये भरपूर कोर्सेस आहेत. यामध्ये तुम्ही एक वर्षाचा किंवा दोन वर्षाच्या कोर्सला देखील प्रवेश घेऊ शकता. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरी सुद्धा लवकर मिळू शकते किंवा तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करू शकता. आता आयटीआयसाठी प्रवेस प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत जाणून घेऊ.
advertisement
संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
आयटीआयला प्रवेश घ्यायचा असल्यास संपूर्ण प्रक्रिया असणार आहे. आयटीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. जून महिन्याच्या शेवटपर्यंत यासाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
आयटीआय प्रवेशासाठी तुम्हाला दहावीचे गुणपत्रक (मार्कशिट) लागेल. तसंच जर तुम्ही आरक्षित वर्गातून असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच नॉन क्रीमिलियर, दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
फी किती?
आयटीआयसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील परवडणारी फी आहे. 950 ते 3000 रुपयांच्या आत मध्ये सर्व फी असणार आहे. याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया झाल्यानंतर मेरीटनुसार लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता आणि तुमचा आवडता कोर्स निवडू शकता.
दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी कोर्स
दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी देखील याठिकाणी ड्रेस मेकिंगचा कोर्स आहे. तर तुम्ही दहावी नापास असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी प्रवेश घेऊ शकता. विशेष म्हणजे आयटीआय शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा नाही. फक्त तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा चांगल्या करिअरसाठी आयटीआय शिक्षणाचा पर्याय निवडू शकता.