एआयच्या मदतीने क्रीडा सामन्यांमधील बॉलचा वेग, दिशेचा अंदाज किंवा संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून घटनांचे विश्लेषण करता येते. ह्याच पद्धतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण ‘एआय फॉर क्रिकेट अॅनालिसिस’ या कोर्समधून दिले जात आहे. त्याशिवाय डेटा सायन्स, मशीन लर्निंग, संगणकीय दृष्टिकोन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, सायबर सिक्युरिटी आदी विषयांवरील मोफत कोर्सेस विद्यार्थ्यांना घेता येतील.
advertisement
कुणाला मिळणार संधी?
हे कोर्स केवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीत, तर शालेय स्तरावरील विद्यार्थी, प्रोग्रामिंग किंवा डेटा सायन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे कोणतेही विद्यार्थी व व्यावसायिक हे कोर्स सहज करू शकतात.
कोर्स कालावधी
प्रत्येक कोर्स 25 ते 45 तासांचा असून, त्यात व्हिडिओ लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स आणि क्विझचा समावेश आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर हे कोर्सेस सहज शिकता येतात.
कशी करायची नोंदणी?
विद्यार्थ्यांना swayam-plus.swayam2.ac.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून लॉगिन करावे लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कोर्स निवडून शिकण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.