नाशिक: महाराष्ट्र बोर्डाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर बारावीनंतरच पुढे काय? कोणता करिअर ऑप्शन निवडायचं? असा प्रश्न पडला असेल. याबाबत नाशिक येथील शिक्षण तज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी माहिती दिलीये. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही त्यानुसार प्रवेश घेऊ शकता.
advertisement
कला शाखेतील संधी
कला शाखेतून जर तुम्ही बारावीची परीक्षा दिली असेल तर त्यानंतर तुम्ही डी.एड, एलएलबी, फॅशन डिझाइनिंग डिप्लोमा, इंटेरियर डिझाइनिंग डिप्लोमा, बी.ए, बी.बी.ए पदवी साठी प्रवेश घेऊ शकता. तसेच तुम्ही फॉरेन लँग्वेज डिप्लोमा करु शकतात. याचसोबत तुम्ही पुढे मास्टर्स करु शकतात. तुमच्याकडे पत्रकारितेचं शिक्षण घेण्याचा देखील पर्याय आहे.
वाणिज्य शाखेतील संधी
जर तुम्ही वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही सी.ए (CA) , बी.कॉम (B.com), सी.एस. फाउंडेशन (CS Foundation), बी.सीए (BCA), बी. आर्किटेक्ट (B.Arch) डी.एड पदवी (D.Ed) प्राप्त करु शकतात. याचसोबत तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स, एमबीए, एल.एल.बी. बी.एड, एम.एड पदवी प्राप्त करु शकतात.
Inspiring Story: लहान वयात लग्न, रोजची मोल-मजुरी, पण शिकण्याची जिद्द, 2 मुलांची आई बारावी पास!
विज्ञान शाखेतील संधी
जर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर पुढे ग्रॅज्युएशन, मास्टर्स, आयटी (IT) अशा अनेक विषयात पदवी प्राप्त करु शकतात. तुम्ही एन.डी.ए (NDA) परीक्षा देऊन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये (Air Force) काम करु शकता. यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ प्लानिंग अँड डिझाइनमध्ये डिग्री प्राप्त करु शकतात. तसेच तुम्ही बी.टेक करुन पुढे एमबीएदेखील करता येईल. हॉटेल मॅनेजमेंट हा देखील एक पर्याय आपल्यासाठी असू शकतो.
त्यातचबरोबर शिक्षण क्षेत्रात तुम्ही तुमच्या आवडतीच्या कला विषयात सुद्धा शिक्षण घेऊ शकणार आहात. सध्या स्किल कोर्सेस सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. यात देखील तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तसेच आणखी काही गोष्टींसाठी आपण जवळच्या शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.