TRENDING:

जिद्द आधीपासूनच होती, त्यात मिळाली नवऱ्याची साथ; 'MPSC'त अव्वल आली पूजा!

Last Updated:

घरोघरी मातीच्याच चुली असं अनेकदा म्हणण्याची वेळ आजही येते, अशा परिस्थितीत पूजा या लग्नानंतर करियर करू पाहणाऱ्या सर्व महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेकांच्या कपाळाला आट्या पडतात. कारण या परीक्षांसाठी लागतो शारीरिक, मानसिक आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनत करण्याची जबरदस्त तयारी. एकदा सुरुवात केली की मग यश मिळेपर्यंत निवांत श्वास न घेण्याची तयारी असेल तरच व्यक्ती स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार करू शकते असं म्हणतात, जे खरंच आहे. 18 जानेवारीला MPSC (Maharashtra Public Service Commission) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि राज्यभरात यशाचा एकच धुरळा उडाला.
advertisement

विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर, विद्यार्थिनींमध्ये बाजी मारली ती पूजा वंजारी यांनी. त्यांना 900 पैकी 570.25 गुण मिळाले. जी परीक्षा द्यायला भल्याभल्यांना घाम फुटतो त्यात संसाराचा गाडा हाकताना घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर मोठी गुणसंख्या मिळवून उत्तीर्ण होणं याबद्दल पूजा यांचं खरोखर कौतुक आहे.

MPSC 2022 चा फायनल रिझल्ट आला! विनायक पाटील राज्यात पहिला; तुमचा क्रमांक कितवा इथं पाहा

advertisement

असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. त्याचप्रमाणे अनेक पुरुष आपल्या आईच्या, बहिणीच्या, बायकोच्या आणि मुलीच्या मागे ठामपणे उभे राहतात. त्यांना यश मिळावं यासाठी आतोनात प्रोत्साहित करतात. पूजा वंजारी यांनीदेखील आपल्या यशाचं श्रेय नवऱ्याला आणि कुटुंबियांना दिलंय.

Success Story : वडिलांचं छोटसं किराणा दुकान, मुलगी आधी इंजिनियर नंतर आयएएस; असा आहे यशाचा फॉर्म्युला

advertisement

पूजा मूळ सांगलीच्या, तर त्यांचं सासर पुणे. त्या शेतकरी कुटुंबातून असल्या तरी त्यांच्या घराला शैक्षणिक पार्श्वभूमी होती. आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास त्यांना आधीपासूनच होता. आता एमपीएससी उत्तीर्ण होऊन त्यांनी तो खराही करून दाखवला. ही परीक्षा सातवेळा दिल्यानंतर आठव्या वेळी त्यांनी यशाला गवसणी घातली, परंतु त्या खचल्या नाहीत. माघार घेण्याचा विचारही केला नाही.

advertisement

पूजा सांगतात, 'मी वेळ मिळेल तसा अभ्यास केला. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आम्ही सर्वजण खूप आनंदात आहोत. अनेक वर्षांच्या कष्टाचं चीज झालंय. माझे वडील शेती करतात तशीच माहेरी शैक्षणिक पार्श्वभूमीही आहे. 2015 मध्ये ठरवलं होतं की आपण एमपीएससी द्यायची. मी अधिकारी होऊ शकते असा विश्वास मला होता. प्रयत्न सुरू ठेवले. सासरी नवरा, सासूबाई आणि जाऊबाईंनी मला अभ्यासासाठी मदत केली. मी दररोज आठ तास अभ्यास करायचे.'

advertisement

याचाच अर्थ पूजा यांना केवळ नवऱ्यानेच साथ दिली नाही, तर संबंध सासरच्या मंडळींकडून त्यांना भक्कम पाठिंबा मिळाला. घरोघरी मातीच्याच चुली असं अनेकदा म्हणण्याची वेळ आजही येते, अशा परिस्थितीत पूजा या लग्नानंतर करियर करू पाहणाऱ्या सर्व महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा 

मराठी बातम्या/करिअर/
जिद्द आधीपासूनच होती, त्यात मिळाली नवऱ्याची साथ; 'MPSC'त अव्वल आली पूजा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल