मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असली तरी मराठी उद्योजकांचा टक्का तुलनेने कमीच आहे. पण अलिकडे काही मराठमोळे तरुण जिद्द आणि मेहनतीने उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहेत. असाच एक तरुण म्हणजे 22 वर्षीय यश मोरे होय. वयाच्या 16 व्या वर्षी परफ्युम उद्योगात पाऊल टाकत त्याने स्वत:चा ब्रँड तयार केला आहे. मायरासा परफ्यूमची आता देशभर ख्याती आहे. आपल्या कर्तृत्वाने यशने इतर तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
advertisement
प्रसिद्ध ब्रँड मायरासा
परफ्यूम, अत्तराचा सुगंध सर्वांनाच आवडतो. पण एका 16 वर्षीय तरुणानं हीच आवड व्यवसायात उतरवली. यश मोरे असं या मराठमोळ्या उद्योजकाचं नाव आहे. या व्यवसायाची सुरुवात त्यानं घरापासून केली. घरात तो परफ्यूम बनवत असे. काही वर्षातच यशनं मोठी भरारी घेतली. स्वत:चं मायरासा म्हणून परफ्यूमचं दुकान सुरू केलं. परेल पूर्व येथील मेरवानजी स्ट्रीटवर विठ्ठल मोरे इमारतीत मायरासा आहे. यश सध्या 22 वर्षांचा असून त्याचा मायसारा ब्रँड देशभर प्रसिद्ध आहे.
'त्या' अपमानामुळं जिद्दीनं शिकलो गाणं, सचिन पिळगावकर यांना कोण म्हणालं बेसुरा? Video
कशी झाली सुरुवात?
यशचं शिक्षण एच.आऱ ग्रॅज्यूएशन आहे. पण जॉब न करता स्वत:चा व्यवसाय तयार करायचा विचार होता. पण त्याची आवड सुगंध अर्धात अत्तर होती. महागडे परफ्यूम विकत घेणं नेहमीच शक्य असेल असं नाही म्हणून त्याने स्वत: या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. कॉलेज करता करता यशनं एका ठिकाणी परफ्यून विक्रीचं काम केलं. त्यातून बराच अभ्यासही केला आणि मिळालेल्या पैशांमधून आपला व्यवसाय उभारण्याच्या दिशेनं वाटचाल सुरुवात केली. आज यशच्या परफ्यूमची फक्त मुंबईत नाहीतर देशभर चर्चा आहेत. एवढचं नाही तर काही ग्राहक हे भारताबाहेरूनही त्याला परफ्यूमची ऑर्डर देतात.
5 हजारांचा परफ्यूम 700 रुपयांत
यश आता लाखोंच्या किंवा हजारोंच्या किमतीतले परफ्यूम अगदी त्याच सुगंधासारखे कमी किमतीत बनवून देतो. मायरासामध्ये परफ्यूमची सुरुवात फक्त 350 रुपयांपासून होते. 5 ते 6 हजारांचे परफ्यूम अगदी 700 ते 800 रुपयांपर्यंत असतात. 20 ते 30 हजारांचे परफ्यूम 800 ते 1000 रुपयांपर्यंत असतात. पुढे जशा ब्रॅंडचे परफ्यूम असतील तशी किंमत वाढते. यशच्या दुकानात हजारो परफ्यूम, अत्तर पाहायला मिळतील जे त्याने स्वत: बनवलेले आहेत.
Business Ideas : फक्त 20 हजार रुपयांमध्ये सुरू करा चप्पलचा व्यवसाय; होईल नफाच नफा
परफ्यूम उद्योगात करियर करायचं असेल तर..
"परफ्य़ूम आणि अत्तर यात फार फरक आहे. तो फक्त 100 किंवा 200 रुपयांपासून सुरु होतो असं लोकांना वाटतं. पण तसं नाहीये. परफ्यूम फार वेगळा विषय आहे. ते सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जर यात करिअर करायचं असेल तर, अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं." असं मत य़शनं व्यक्त केलंय. तसेच तरुणांनाही परफ्यूम मेकिंगच्या क्षेत्रात येण्याविषयी सांगितलं. अवघ्या 16 वर्षी उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या यशनं 22 व्या वर्षी देशभरात स्वत:ची ओळख निर्माण केलीय.