मुंबई महापालिकेच्या या पदभरतीबाबत सविस्तर माहिती https://www.mcgm.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली असून 9 सप्टेंबरला रात्री 11.49 वाजेपर्यंत अर्ज करता येतील. पाणीपुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने ही पदभरती करण्यात येत आहे.
मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी! जर्मनीत 10 हजार जागा, राज्य सरकार देणार प्रशिक्षण
advertisement
आरक्षित प्रवर्गानुसार जागा
अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती अ (49), भटक्या जमाती ब (54), भटक्या जमाती इ (39), भटक्या जमाती (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (185) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (125), खुला प्रवर्ग (56) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती केली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीये.
आता आपल्या घरात बसूनच पाहा नाटक, तेही मोफत! पुण्यात कलाकारच येत आहेत घरी
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निदर्शनानुसार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शहर डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट क मधील रुपये 25,500-81,100 (पे मॅट्रिक्स एम -15) आदी भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील ही पदे भरण्यात येणार आहेत.