सुनिता या सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केट येथे राहतात. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सुनीता यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. काही कालांतराने त्यांचे लग्नही झाले. पण शिक्षण शिकण्याची गोडी त्यांनी काही सोडली नाही. घरातल्या लोकांची चर्चा करून त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळपर्यंत घरातील सर्व कामे आटपून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत शाळेला जात होत्या.
advertisement
त्यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दहावीच्या परीक्षा दिली असून या दहावीच्या परीक्षेत त्यांना 44 टक्के गुण मिळाले आहेत. शिक्षण घेण्याला वयाची मर्यादा नाही. म्हणून त्यांनी देखील परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि दहावी उत्तीर्ण झाल्या. सुनीता रापुरे या पास झाल्यावर घरातील लोकांनी शाळेत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे. तर आता सुनीता रपुरे या अकरावीमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणार असल्याची माहिती लोकल 18 शी बोलताना दिली.