शॉपिंगदरम्यान घडलेल्या घटनेतून सुरूवात
डॉ. आम्रपाली मोहिते यांचं M.A. इकॉनॉमिक्स पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्यानी सांगितलं की, विमाननगरमध्ये शॉपिंगला गेले असताना काही मुलं त्याच्याकडे पैसे मागायला आली. त्यानी त्या मुलांना थोडे पैसे दिले. पण त्यानंतर ती मुलं दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यावर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं आणि यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा निर्णय त्यांनी घेतला. यातूनच फुटपाथ शाळेची सुरुवात झाली.
advertisement
डॉ. आम्रपाली मोहिते यांचा फुटपाथ शाळेचा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जातो. सुरुवातीला त्या मुलांच्या पालकांशी संवाद साधून मुलं रस्त्यावर राहणं किती असुरक्षित आहे हे समजावून सांगतात. त्यानंतर चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या मदतीने मुलांना निवासी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न होतो. पालक तयार नसतील, तर शासकीय शाळेत मुलांना घालण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे सकाळी ते शाळेत जाऊन संध्याकाळी घरी परतू शकतात. पण या दोन्ही पर्यायांना जर पालक नकार देत असतील, तर शिक्षण थेट त्या मुलांपर्यंत पोहोचवले जाते. रस्त्यावरच ‘फुटपाथ शाळा’ भरवून ही मुलं शिक्षणाशी जोडली जातात. या उपक्रमातून अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं आहे.
1,087 मुलांचं पालकत्व स्वीकारलं
आतापर्यंत डॉ. आम्रपाली मोहिते यांनी 137 मुलांची शाळेची फी स्वतः जमा केलेल्या पैशांतून भरली आहे. विशेष म्हणजे हे पैसे त्यांनी रस्त्यावर टाळ्या वाजवून जमा केले. याशिवाय 1,087 मुलांचं शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारलं आहे, तर 47 मुलांना निवासी शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. सध्या त्या मालधक्का चौकात स्वतः मुलांना शिकवतात.