TRENDING:

4 वेळा अपयश पण तो खचला नाही, UPSC परीक्षेत पुणेकर शुभमनं बाजी मारलीच! Video

Last Updated:

UPSC परीक्षेत पुण्यातील शुभम भगवान थेट यानं घवघवीत यश मिळवलं असून त्याला 359 रँक प्राप्त झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय. यात पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या मुलानंही यश मिळवलंय. शुभम भगवान थेट यानं देशात 359 रँक प्राप्त केला आहे. या यशानं उद्योगनगरीसह कुटुंबीय आणि पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुभमवर कौतुकाचा वर्षाव केलाय.

advertisement

शुभम थिटे याचे कुटुंबीय मुळचे शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ येथील रहिवासी आहे. शुभमचे वडील भगवान थिटे हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. 1993 पासून वाकड - कावेरीनगर पोलीस लाईनमध्ये थिटे कुटूंब वास्तव्यास आहे. शुभमने आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. मात्र, शुभमचे ध्येय वेगळे होते.

कार्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली अन् सुरू केला अभ्यास, नागपूरच्या संस्कारचं UPSC परीक्षेत यश, Video

advertisement

प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न

शुभमने सुरुवातीपासूनच भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यादृष्टीने गेल्या सहा वर्षांपासून युपीएससी परिक्षेचा अभ्यास करीत होता. दोन वर्षे कोरोना प्रादूर्भावामुळे परिक्षा झाली नाही. युपीएससीच्या चार परिक्षांमध्ये त्याला अपयश आले. मात्र, अपयशाने खचून न जाता शुभमने पाचव्यांदा युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. रात्रं-दिवस जोमाने अभ्यास करीत त्याने परिक्षा दिली, असं शुभमनं सांगितलं.

advertisement

PSI होण्याची मनात होती जिद्द, हार मानली नाही, तब्बल 8 वेळा मुख्य परीक्षा दिल्यानंतर मिळालं यश

अखेर यशाला गवसणी

शुभमनं 2023 मध्ये युपीएससीची पाचव्यांदा परीक्षा दिली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत शुभमनं यशाला गवसणी घातली. त्याला देशात 359 वा रँक मिळाला. विशेष म्हणजे फक्त सेल्फ स्टडी करून शुभमने यूपीएससी सारख्या अवघड परीक्षेत यश मिळवलं. त्यामुळे शुभमवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
4 वेळा अपयश पण तो खचला नाही, UPSC परीक्षेत पुणेकर शुभमनं बाजी मारलीच! Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल