घडले काय?
सिद्धांत श्रीकांत सगरे (वय-24, रा. कबनूर) आणि दिया सचिन गायकवाड (वय-20, रा. कोरोची) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 7 सप्टेंबर रोजी कोरोची येथील भारती सजन ढाले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. यामध्ये सुमारे 2 लाख 87 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, शहापूर भागातील तुळजा भवानी मंदिरासमोर दुचाकीवरून फिरत असलेले सिद्धांत आणि दिया पोलिसांना संशयास्पद वाटले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्या पिशवीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने सापडले. कडक चौकशी केल्यानंतर, त्यांनी लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कोरोची येथे चोरी केल्याचे कबूल केले.
advertisement
पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक केली आणि चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे, अरीफ वडगावे, रोहित डावाळे, सतीश कुंभार, अर्जुन फातले आणि ज्ञानेश्वरी राख यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
हे ही वाचा : सायबर भामट्यांचा नवा डाव! ED आणि CBI अधिकारी बनून सांगलीतील दोघांना 37 लाखांचा चुना, कशी केली फसवणूक?
हे ही वाचा : Kolhapur Politics: 'गोकुळ'च्या सभेत नविद मुश्रीफ यांना टार्गेट केलं; सतेज पाटील यांची महाडिकांवर टिका