Kolhapur Politics: 'गोकुळ'च्या सभेत नविद मुश्रीफ यांना टार्गेट केलं; सतेज पाटील यांची महाडिकांवर टिका
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur Politics : 'गोकुळ' दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या राजकीय वादावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे....
Kolhapur Politics : 'गोकुळ' दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या राजकीय वादावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'गोकुळ'चे चेअरमन नविद मुश्रीफ यांना राजकीय हेतूने जाणूनबुजून टार्गेट केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या निदर्शनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'प्रश्न विचारणाऱ्यांना परिपक्वता पाहिजे'
'गोकुळ'च्या सभेत (Kolhapur Politics) संचालिका शौमिका महाडिक यांना एकटे पाडण्यात आले का, या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले की, "नविद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. सभा ही सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी असते, पण तरीही नविद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांवर तब्बल 55 मिनिटे उत्तरे दिली, अगदी लेखी उत्तरेही दिली. तरीही त्यांचे समाधान होत नसेल, तर हे राजकीयदृष्ट्या मुश्रीफ यांना टार्गेट केलं जात आहे."
advertisement
निवडणूक आयोगावर टीका
मतदार याद्यांमधील गोंधळावर बोलताना सतेज पाटील यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. ते म्हणाले, "देशातील जनतेच्या मनात 'आपण दिलेले मत योग्य उमेदवारालाच पडले आहे का?' असा संभ्रम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अत्यंत पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे. अचूक मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी त्यांची आहे." त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शेवटच्या 8 दिवसांपर्यंतची मतदार यादी न ठरवता 31 जुलै ही अंतिम तारीख ठरवून अचूक मतदार याद्या तयार कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
advertisement
हे ही वाचा : Maratha Reservation: 'कुणबी' दाखला कसा मिळवाल? जुने पुरावे कुठे आणि कसे शोधाल? जाणून घ्या A to Z माहिती
हे ही वाचा : बिया कमी, गर जास्त... कोल्हापूरच्या बाजारात 'बाळानगरी' सीताफळ दाखल; आरोग्यासाठी सर्वोत्तम फळ!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 9:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Politics: 'गोकुळ'च्या सभेत नविद मुश्रीफ यांना टार्गेट केलं; सतेज पाटील यांची महाडिकांवर टिका