लऊळ येथील शेतकरी संदीप लिंबाजी पवार हे 14 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपून रात्री साडेनऊच्या सुमारास घराशेजारील त्यांच्या निवासस्थानी झोपले होते. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या छतावरून अंगणात उतरून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूमच्या कड्या बाहेरून बंद करून बाजूच्या खोलीतील कपाट फोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पाण्यावरून वाद, 9 वर्षाच्या भावालाच संपवलं अन्...., बीडमधील ‘त्या’ प्रकरणात मोठं अपडेट
advertisement
कपाटातील लॉकर तोडून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने लंपास केले. यात सोन्याचे एकूण साडेअकरा तोळे दागिने, विविध नेकलेस, गंठण, चैन, झुंबर, बाळी तसेच चांदीचे करंडे व बाजूबंद यांचा समावेश आहे. दागिन्यांचे एकूण वजन आणि किंमत लक्षात घेता ही घरफोडी सुनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी घराच्या कड्या बाहेरून लावलेल्या दिसल्याने पवार यांना संशय आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक सक्रिय केले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.






