सबा असद खान (वय 24, रा. टाउनहॉल, भडकलगेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह 11 जून 2023 रोजी असद अय्युब खान (वय 28, रा. सैलाबनगर, नांदेड) याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे दोन ते तीन महिने सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर पती असद आणि सासरे अय्युब यांनी हुंड्याचे उरलेले पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी सुरू केली.
advertisement
बाप की शैतान? घरात कुणी नव्हतं, पोटच्या लेकीवरच..., न्यायालयाने घडवली जन्माची अद्दल
वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हा पती, सासरे, सासू रेश्मा, दीर अरबाज व सोहेल, नणंद सुमैय्या आणि नंदोई मोहसीन यांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत “जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये सबा गरोदर असल्याचे समजल्यानंतर सासरच्यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर प्रसूतीसाठी ती माहेरी आली. येथे तिला मुलगी झाली. मात्र यावर पतीने “मला मुलगा हवा होता, मुलगी नको. तू तिकडेच राहा. इकडे आलीस तर तुला जिवंत मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्या वेळेपासून सबा आपल्या आई-वडिलांकडेच वास्तव्यास आहे.
दरम्यान, पतीने फोनवरून तीन वेळा “तलाक, तलाक, तलाक” असे म्हणत तिहेरी तलाक दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार गोरखनाथ पवार करत आहेत.






