ईडीची पडणार होती धाड, नवरा मंडपातून झाला गायब
ही थरारक घटना जयपूरमधील अलिशान फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये घडली. नवरदेव सौरभ आहुजा हा सुमारे 15,000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातील एक महत्त्वाचा पाहिजे असलेला आरोपी आहे. ईडी अधिकाऱ्यांना नेमकी खबर मिळाली होती की, सौरभ आहुजा आपल्या कुटुंबासोबत फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये शांतपणे लग्न करत आहे. त्याची खबर मिळताच, ईडीचे पथक त्याला अटक करण्यासाठी विवाह स्थळी पोहोचले. मात्र, धाड पडणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्याने सौरभ आहुजा 'सप्तपदी' पूर्ण होण्यापूर्वीच, वधूच्या बाजूचे नातेवाईक आणि पाहुणे अवाक होऊन पाहत असताना, मंडपातून अचानक गायब झाला.
advertisement
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपसंबंधी होता कोट्यवधींचा घोटाळा
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आहुजाने तातडीचा फोन आल्याचे सांगून अचानक लग्नाच्या स्टेजवरून काढता पाय घेतला आणि कुणाला काही कळायच्या आतच तो दिसेनासा झाला. ईडीचे अधिकारी त्याला अटक करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत तो पसार झाला होता. सौरभ आहुजावर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारांचे व्यवस्थापन केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो काही काळापासून ईडीच्या रडारवर होता. त्याच्या अटकेसाठी रायपूरमधून एक विशेष पथक जयपूरला पाठवण्यात आले होते.
तिघांनी घेतलंय ताब्यात...
ईडीने नवविवाहित वधूची, तसेच समारंभाला उपस्थित असलेल्या अनेक नातेवाईक आणि पाहुण्यांची कसून चौकशी केली. आहुजाला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे, ज्यात प्रणवेंद्र नावाच्या संशयिताचा समावेश आहे. पुढील चौकशीसाठी या तिघांनाही रायपूरला नेण्यात आले आहे. सौरभ आहुजाला पकडण्यासाठी ईडीने मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. महादेव ॲप घोटाळ्याचा तपास अजूनही सुरू असून, येत्या काळात आणखी काही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा : गावकऱ्यांचा कांड! पतीचा मित्र अन् 6 मुलांची आई, लावलं जबरदस्तीने लग्न; पण सत्य कळताच उडाली सर्वांची झोप
हे ही वाचा : हनिमून ठरला नरक! धावत्या ट्रेनमधून ढकललं बायकोला, नवरा झाला गायब, पण आता...