संपूर्ण प्रकरण काय?
सकाळी सहा वाजता जनावरांना वैरण आणायला जातो असे सांगून संभाजी पाटील शेताकडे गेले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.
संभाजी पाटील यांनी मुलाला सरकारी नोकरी लावण्यासाठी तीन वर्षांपूर्वी कर्ज घेऊन आणि नातेवाईकांकडून पैसे जमा करून वाळवा येथील एका व्यक्तीला 18 लाख रुपये दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही मुलाला नोकरी मिळाली नाही आणि पैसे परत मागूनही ती व्यक्ती टाळाटाळ करत होती.
advertisement
या व्यक्तीला भेटण्यासाठी संभाजी पाटील यांना अनेकदा वाळव्याला जावे लागत होते. याचा त्यांना खूप मानसिक त्रास होत होता, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संभाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
हे ही वाचा : 'कास' पठार फुलांनी बहरलं! निसर्गाची अद्भूत दुनिया अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी, ऑनलाईन बुकिंग कसे कराल?
हे ही वाचा : Pune Market: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पुण्यातील मार्केट यार्ड 2 दिवस बंद राहणार